पातोंडा व नांद्री गावातील पारधी वस्त्यांवर पूरग्रस्तांना प्रशासनाचा दिलासा
1 min read

पातोंडा व नांद्री गावातील पारधी वस्त्यांवर पूरग्रस्तांना प्रशासनाचा दिलासा

Loading

पातोंडा व नांद्री गावातील पारधी वस्त्यांवर पूरग्रस्तांना प्रशासनाचा दिलासा

अमळनेर प्रतिनिधी
पातोंडा व नांद्री गावातील पारधी वस्त्यांमध्ये आलेल्या पूरपाण्यामुळे बाधित कुटुंबांना सुरक्षिततेच्या दृष्टीने पातोंडा येथील जिल्हा परिषद शाळेत तसेच नांद्री गावातील स्थानिक भवनात तात्पुरत्या स्वरूपात हलविण्यात आले.
या ठिकाणी प्रशासन व ग्रामस्थांच्या मदतीने पूरग्रस्तांना खिचडी, चहा, पिण्याचे स्वच्छ पाणी तसेच बिछायतीची व्यवस्था करून दिलासा देण्यात आला आहे. सद्यस्थितीत पूरस्थिती निवळली असली तरीही संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी सुरक्षित ठिकाणी थांबण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
हे मदत कार्य प्रांताधिकारी नितीन कुमार मुंडावरे व तहसीलदार रूपेश कुमार सुराणा यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार प्रशांत धमके, महसूल सहाय्यक अनिल चौधरी व प्रदीप महाले, पातोंडा तलाठी पवनकुमार शिंगारे आणि नांद्री तलाठी किरण महाजन यांनी स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने हाती घेतले.

काही क्षणचित्रे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *