अखिल भारतीय माळी महासंघातर्फे विद्यार्थ्यांचा जाहीर गुणगौरव सोहळा”
![]()
“अखिल भारतीय माळी महासंघातर्फे विद्यार्थ्यांचा जाहीर गुणगौरव सोहळा”
धुळे प्रतिनिधी(काशिनाथ माळी) –
समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यासाठी अखिल भारतीय माळी महासंघ धुळे शहर व तालुका शाखेतर्फे येत्या ३१ ऑगस्ट २०२५ रोजी, रविवार, सकाळी १० वाजता धुळे येथील कानुश्री मंगल कार्यालय, आई एकविरा मंदिराजवळ भव्य गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या सोहळ्यात इयत्ता १०वीत ८५% पेक्षा जास्त गुण, १२वीत ८०% पेक्षा जास्त गुण मिळविणारे विद्यार्थी तसेच पदवी, पदव्युत्तर, फार्मसी, अभियांत्रिकी, मेडिकल, कृषी शाखांतील तसेच MPSC, UPSC व इतर विशेष पदांवर निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा व समाजातील गुणवंत कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
माळी समाजातील सर्व बांधव, शिक्षक, पालक व नातेवाईकांनी आपल्या गावातील व शाळेतील पात्र विद्यार्थ्यांची नावे पाठवून या सोहळ्यात सहभाग नोंदवावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
या कार्यक्रमास समाजातील मान्यवर उपस्थित राहणार असून, उपस्थित सर्व बांधवांसाठी जेवणाची सोय आयोजकांकडून करण्यात आली आहे.
समाजातील विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढविणे, त्यांना प्रोत्साहन देणे व शैक्षणिक क्षेत्रात नवे आदर्श निर्माण करण्याचा हेतू या उपक्रमामागे आहे.
समस्त पदाधिकारी व कार्यकर्ते – अखिल भारतीय माळी महासंघ, धुळे शहर व तालुका यांनी आवाहन केले आहे.

