तांदळी ग्रामपंचायतीत स्वातंत्र्यदिनाचा उत्साह – ध्वजारोहण, सांस्कृतिक कार्यक्रम व शैक्षणिक साहित्य वाटप
1 min read

तांदळी ग्रामपंचायतीत स्वातंत्र्यदिनाचा उत्साह – ध्वजारोहण, सांस्कृतिक कार्यक्रम व शैक्षणिक साहित्य वाटप

Loading

तांदळी ग्रामपंचायतीत स्वातंत्र्यदिनाचा उत्साह – ध्वजारोहण, सांस्कृतिक कार्यक्रम व शैक्षणिक साहित्य वाटप

अमळनेर प्रतिनिधी –
आज तांदळी गावात स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ग्रामपंचायतीत ध्वजारोहणाचा मान गावाच्या प्रथम नागरिक सरपंच सौ. रत्नाबाई सुनिलसिंग परदेशी यांना मिळाला. तर जिल्हा परिषद शाळेत ध्वजारोहण ग्रामपंचायत सदस्य श्री. रतन सखाराम भील यांच्या हस्ते पार पडले.
विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत, ध्वजगीत, महाराष्ट्र गीत, देशभक्तीपर भाषणे, नृत्य आणि कवायत यांचे मनमोहक सादरीकरण करून कार्यक्रमाला रंगत आणली.

 

 

 

 

 

 

 

या प्रसंगी सरपंच सौ. रत्नाबाई सुनिलसिंग परदेशी व श्री. सुनिलसिंग इंदलसिंग परदेशी यांच्या तर्फे प्राथमिक शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे कीट वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना प्रोत्साहन देण्यात आले. तसेच जि.प. शाळा तांदळी येथील शिक्षकांचा सत्कारही करण्यात आला.
कार्यक्रमास गावातील सर्व मान्यवर, सरपंच, पदाधिकारी, ग्रामस्थ, ज्येष्ठ नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी जि.प. तांदळी शाळेचे मुख्याध्यापक शंकरराव बोरसे, उपक्रमशील शिक्षक सुधीर चौधरी, व युवा प्रशिक्षणार्थी शिक्षक चि. कृणाल पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.
शेवटी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधीर चौधरी सर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *