मांडळ सहकारी सोसायटी निवडणूक — नेतृत्वाची धुरा नामदेव बडगुजर व रविंद्र पाटील यांच्याकडे
1 min read

मांडळ सहकारी सोसायटी निवडणूक — नेतृत्वाची धुरा नामदेव बडगुजर व रविंद्र पाटील यांच्याकडे

Loading

मांडळ सहकारी सोसायटी निवडणूक — नेतृत्वाची धुरा नामदेव बडगुजर व रविंद्र पाटील यांच्याकडे

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) –
नुतन मंडळ विविध कार्यकारी सहकारी सोसायटी मर्यादित, मांडळ ता. अमळनेर या संस्थेची निवडणूक दिनांक 16 ऑगस्ट 2025 रोजी उत्साहात पार पडली. या निवडणुकीत चेअरमन पदावर श्री. नामदेव पोपट बडगुजर तर व्हाईस चेअरमन पदावर श्री. रविंद्र रावण पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
या वेळी उपस्थित संचालक सदस्य होते : सौ. ललिता विलास सोनवणे, श्री. शालिग्राम नथ्थु बडगुजर, श्री. सुभाष महादू पाटील, श्री. शेख फारूक हाजी अब्दुल रज्जाक, श्री. देविदास पुना कोळी, श्रीमती इंदूबाई यशवंत पाटील, श्रीमती सुंदराबाई धोंडू कोळी, श्री. डिगंबर हिमतराव मराठे, श्री. सुरेश मंगा महाजन, श्री. सुरेश दगा धनगर, श्री. सोमनाथ नारायण खैरनार.
या निवडणुकीचे निर्णय अधिकारी श्री. सुनील महाजन साहेब होते. श्री. रविंद्र हिम्मत पाटील यांनी सचिव म्हणून तर श्री. प्रदीप पाटील यांनी शिपाई म्हणून कामकाज पाहिले.
सत्कार प्रसंगी मान्यवर म्हणून उपस्थित होते – श्री. दीपक काशिनाथ बडगुजर (सरपंच, मंडळ ग्रामपंचायत), श्री. अशोक हिमत्तराव पाटील (संचालक, मार्केट कमिटी अमळनेर), श्री. दीपक पंढरीनाथ पाटील (उपसभापती, पंचायत समिती अमळनेर), श्री. विलास ओंकार सोनवणे (से.नि. सहकार खाते, ऑडिट विभाग), श्री. वसंत रावण सोनवणे (माजी चेअरमन), श्री. मनोहर किसन पाटील (माजी सरपंच), श्री. विजय नथू पाटील (माजी सरपंच), श्री. रतीलाल कृष्णा पाटील (माजी सरपंच), श्री. सुरेश पाटील सर, श्री. विनायक आण्णा बडगुजर (माजी सरपंच), श्री. बाळासाहेब पवार (माजी चेअरमन), श्री. अनिल जैन, श्री. गणेश शालिग्राम बडगुजर, श्री. शेखर पाटील व श्री. रावसाहेब पंडित कोळी.
सर्व मान्यवरांनी नवनिर्वाचित चेअरमन श्री. नामदेव पोपट बडगुजर व व्हाईस चेअरमन श्री. रविंद्र रावण पाटील यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व त्यांच्या पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *