स्वातंत्र्य दिनानिमित्त साने गुरुजी कन्या हायस्कूलतर्फे सैनिक व पोलीस बांधवांना पत्रांद्वारे ॠणभाव व्यक्त
![]()
स्वातंत्र्य दिनानिमित्त साने गुरुजी कन्या हायस्कूलतर्फे सैनिक व पोलीस बांधवांना पत्रांद्वारे ॠणभाव व्यक्त
अमळनेर प्रतिनिधी) – १५ ऑगस्ट, स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने अमळनेर नगर परिषदेच्या उपक्रमाअंतर्गत साने गुरुजी कन्या हायस्कूल, अमळनेर येथील विद्यार्थिनींनी देशरक्षक सैनिक व पोलीस बांधवांप्रती कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्यासाठी हृदयस्पर्शी पत्र लेखनाचा उपक्रम राबवला.
या उपक्रमांतर्गत विद्यार्थिनींनी आपल्या भावना शब्दबद्ध करून पत्रे लिहिली. त्यातील प्रातिनिधिक पत्रे सन्माननीय समाधान गायकवाड साहेब, श्री. पाटील साहेब व त्यांच्या सहकाऱ्यांना स्नेहपूर्वक सुपूर्त करण्यात आली. या वेळी मुख्याध्यापिका सौ. अनिता बोरसे मॅडम, विद्यार्थिनी कल्याणी संदीप पाटील (इ.१० वी ‘ब’), वैष्णवी महेश पाटील (इ.१० वी ‘ब’), विद्यादिदी, मुख्याध्यापक श्री. सुनील पाटील, श्री. मुकेश पाटील, श्री. डी. ए. धनगर आदी मान्यवर उपस्थित होते.
सैनिक व पोलीस बांधवांच्या त्यागमय सेवेप्रती विद्यार्थिनींनी व्यक्त केलेली ॠणभावना पाहून सर्वांचे डोळे पाणावले. या उपक्रमाचे संस्थेचे अध्यक्ष श्री. हेमकांत पाटील, सचिव श्री. संदीप घोरपडे सर तसेच सर्व संचालक मंडळ यांनी अभिनंदन करून शाळेच्या पुढाकाराचे कौतुक केले.
हा उपक्रम विद्यार्थिनींमध्ये देशभक्तीची जाणीव व सामाजिक जबाबदारीची भावना दृढ करणारा ठरल्याचे सर्व मान्यवरांनी यावेळी नमूद केले.
—

