तुम्ही ज्या मैदानावर आहात त्याच मैदानाने मला घडवलं.* – अल्पेश दगडे  *सम्राट अशोक विद्यालयात सेवानिवृत्त सैनिकाच्या हस्ते ध्वजारोहण.*
1 min read

तुम्ही ज्या मैदानावर आहात त्याच मैदानाने मला घडवलं.* – अल्पेश दगडे *सम्राट अशोक विद्यालयात सेवानिवृत्त सैनिकाच्या हस्ते ध्वजारोहण.*

Loading

*तुम्ही ज्या मैदानावर आहात त्याच मैदानाने मला घडवलं.*
– अल्पेश दगडे

*सम्राट अशोक विद्यालयात सेवानिवृत्त सैनिकाच्या हस्ते ध्वजारोहण.*

ठाणे:कल्याण( मनिलालशिंपी ) – कल्याण पूर्वेतील सम्राट अशोक विद्यालयात सेवानिवृत्त सैनिक हवलदार अल्पेश दगडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. सम्राट अशोक शाळेत विद्यार्थी व पालकांना कार्यक्रमाच्या माध्यमातून नेहमीच प्रेरणा व प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न असतो. 79 व्या स्वातंत्र्य दिनाचे ध्वजारोहण शाळेने माजी विद्यार्थी सेवानिवृत्त झालेला सैन्य दलातील हवलदार अल्पेश दगडे यांच्या हस्ते ध्वजारोहण केले. अल्पेश दगडे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाला. तुम्ही ज्या मैदानावर आहात त्याच मैदानाने मला घडवलं. शाळेच्या वेगवेगळ्या कार्यक्रमात सहभागी व्हायचो त्या कार्यक्रमांनी मला प्रेरणा मिळाली. देश सेवा करण्याची मला आवड निर्माण झाली आणि पहिल्याच प्रयत्नात सैन्य दलात भरती झालो. आपला फिटनेस खूपच महत्त्वाचा आहे त्याच्याकडे लक्ष द्या. अभ्यासाबरोबर आपला आवडता छंद जोपासा. प्रामाणिक देश सेवा करून आज आपल्यासमोर उभा आहे हे माझं भाग्य आहे. असेही दगडे म्हणाले इयत्ता तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी देशभक्ती गीतांवर संगीत कवायत संचलन व इयत्ता नववी एम सी सी च्या विद्यार्थ्यांनी तिरंगी झेंड्याला दिलेली सलामी कार्यक्रमाचे तसेच महापुरुषांच्या विविध वेशभूषेवर आलेले पहिली दुसरीचे विद्यार्थी कार्यक्रमाचे विशेष आकर्षण होते. संस्थेचे अध्यक्ष पी.टी. धनविजय, माध्य.मुख्याध्यापक गुलाबराव पाटील, प्राथ. मुख्याध्यापिका सुजाता नलावडे,पालक प्रतिनिधी व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांबरोबर परिसरात तिरंगा रॅली काढत देश अभिमान बाळगत स्वातंत्र्य दिन साजरा केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *