जनतेच्या श्रमांचा, त्यागाचा सन्मान – नोबेल फाउंडेशनचा अनोखा उपक्रम
![]()
जनतेच्या श्रमांचा, त्यागाचा सन्मान – नोबेल फाउंडेशनचा अनोखा उपक्रम
जळगाव प्रतिनिधी- भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करीत आहोत.आपल्या देशाला मिळालेले स्वातंत्र्य हे स्वातंत्र्यवीरांच्या बलिदानाने आणि लाखो लोकांच्या मेहनतीने मिळालेले आहे. आजही या स्वतंत्र भारताला जे करोडो हात चालवत आहेत त्या करोडो लोकांचा हा भारत आहे या देश चालवणाऱ्या लोकांचा स्वातंत्र्य दिनाला खऱ्या अर्थाने सन्मान व्हावा आणि येणाऱ्या पिढीला या लोकांबद्दल मनात कृतज्ञता असावी यासाठी नोबेल फाउंडेशनने स्वातंत्र्य दिन आगळावेगळा पद्धतीने साजरा केला.
या दिवसाला नोबेल फाउंडेशनच्या सर्व विद्यार्थ्यांनी समाजाला उभारणीसाठी हातभार लावणाऱ्या तसेच समाजाचे रक्षण करणाऱ्या सर्व पेशांमधील व्यक्तिमत्त्वांचा त्यांच्या कर्मभूमीत जाऊन सन्मान केला. यात चर्मकार बांधव, भाजीपाला विकणाऱ्या मावशी, फळ विकणारे चाचा, फक्त पन्नास रुपयात पेशंटला बरे करणारे जळगावचे देवदूत डॉक्टर गिरीश भाऊ सहस्रबुद्धे सर ,जळगावची विधीक्षेत्रातील ओळख वंदनीय सुशील अत्रे सर, रजनीगंधा हॉस्पिटलचे अस्थीरोग तज्ज्ञ डॉ अभिजित पाटील, तसेच जळगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक आव्हाड साहेब व सहकारी यांचा सत्कार करण्यात आला.विद्यार्थ्यांनी प्रत्येकाच्या कामाच्या ठिकाणी जाऊन त्यांना स्मृतिचिन्ह आणि शाल श्रीफळ देऊन सत्कार केला. यावेळी नोबेल फाउंडेशनचे संचालक जयदीप पाटील, संचालक राजेंद्र पाटील, यशवर्धिनी स्पर्धा परीक्षा केंद्राचे संचालक अक्षय देवरे,विवेक साळुंखे ,जयवीर पाटील, मुकुंद जाधव उपस्थित होते.


मी स्वतः या वरील व्यक्तींचा ऋणी आहे आणि राहील ही