कै.. बळीरामदादा माध्यमिक विद्यालय ब्राम्हणवेल येथे १५ ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिनाचा उत्सव जल्लोषात साजरा!*
![]()
*कै. बळीरामदादा माध्यमिक विद्यालय ब्राम्हणवेल येथे १५ ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिनाचा उत्सव जल्लोषात साजरा!*
धुळे प्रतिनिधी
कै. बळीरामदादा माध्यमिक विद्यालय ब्राम्हणवेल ता. साक्री जि. धुळे येथे आज दि. १५ ऑगस्ट २०२५ रोजी भारतीय स्वातंत्र्य दिनाचा उत्सव ब्राम्हणवेल गावात ढोल ताशांच्या गजराने रॅली काढून जल्लोषात साजरा करण्यात आला. पारंपारिक पद्धतीने सर्व प्रथम जि. प. मराठी शाळा, ग्राम सचिवालय, भारतीय स्टेट बँक, व माध्यमिक विद्यालय, ब्राम्हणवेल येथे ध्वजारोहणाचा कार्यक्रम नियोजनानुसार पार पडला. कै. बळीरामदादा माध्यमिक विद्यालय माध्यमिक विद्यालय ब्राम्हणवेल येथे संस्थेचे अध्यक्ष मा. नानासाहेब तुकाराम बळीराम माळी यांच्या जेष्ठ स्नुषा सौ. शोभाताई विलास महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. लगेचच राष्ट्रगीत, राज्य गीत, झेंडा गीत शिस्तबद्ध गायन करण्यात आले. तद्नंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे संचालक मा. नानासाहेब दगा गोविंदा खैरनार यांनी धुरा सांभाळली. सुमधुर स्वागत गीत गाऊन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमात संस्थेचे सचिव मा. आप्पासाहेब एकनाथ बळीराम महाजन आणि सर्व संचालक मंडळ, मुख्याध्यापक मा. माळी बी. एन., शिक्षक श्री. माळी के. एन., श्री. हिरामण सोनवणे, श्री. निकुंभ बी. एस., श्री. रविंद्र सुर्यवंशी, श्री. प्रमोद महाजन, लिपिक श्री. चेतन महाजन, शिपाई श्री. पंडित खैरनार, श्री. सुनिल ठाकरे, जि. प. शाळेचे मुख्याध्यापक मा. जगताप सर व सर्व शिक्षक वृंद, ब्राम्हणवेल गावाच्या सरपंच मा. सौ. रेखाताई सुरेश देसाई, उपसरपंच मा. अण्णासाहेब कैलास भिका महाजन, सर्व ग्रामपंचायत सदस्य, पोलिस पाटील मा. शाम गंगाधर नांद्रे, ग्रामसेवक मा. गायकवाड साहेब, मा. तलाठी आप्पासाहेब, आरोग्य विभाग सब सेंटर चे सी. एच. ओ. डॉ .मा.वळवी साहेब, आरोग्य सेविका मा. जाधव मॅडम, सर्व अंगणवाडी सेविका, मदतनीस ताईसाहेब आणि बहुसंख्येने पालक, व नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमात नियोजनानुसार माध्यमिक व प्राथमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सामुदायिक कवायत देशभक्तीपर गीतांच्या तालावर अतिशय शिस्तबद्ध सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्य शूर वीरांचे कार्य दर्शन, विकसित भारताचे दर्शन, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, औद्योगिक क्रांतीपर मुद्द्यांवर विविध भाषणातून विद्यार्थी विद्यार्थिनींनी आपले सकारात्मक विचार मांडले. त्यासोबतच महागाई, बेरोजगारी, प्रदुषण, भ्रष्टाचार अशा विविध मुद्यावर प्रकाश टाकण्यात आला. स्वातंत्र्याचे मोल जाणून एकता, अखंडता, आणि सुरक्षिततासाठी सर्व नागरिकांनी दक्ष राहावे असे आवाहनही भाषणांमधून प्रकट झाले. विविध देशभक्तीपर व सामाजिक आणि आदिवासी संस्कृतीचे विशेष नेपथ्य वेशभूषासह दर्शन घडविणारे अतिशय उत्कृष्ट नृत्य सादरीकरण व गायन सादरीकरण करणाऱ्या व उत्साह भरणाऱ्या चिमुकल्या विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक करण्यात आले. प्रत्येक सादरीकरणाला मान्यवरांनी भरभरून प्रतिसाद दिला व बक्षीसांची बरसात केली. कार्यक्रमात दि. १३ व १४ जुलै २०२५ रोजी घेण्यात आलेल्या ध्वजारोहणासह आयोजित चित्रकला, रांगोळी, व निबंध स्पर्धेचे निकाल घोषित करून विजेत्या विद्यार्थ्यांना रोख बक्षिसे मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली. याकामी माध्यमिक व प्राथमिक शाळेच्या शिक्षकांनी विशेष मेहनत घेतल्यामुळे मान्यवरांनी शिक्षकांचेही अध्यक्षीय भाषणात कौतुक केले. संस्थेच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना चॉकलेट व बिस्किटे वाटप करून समारोप करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कलाशिक्षक श्री. हिरामण सोनवणे यांनी केले. तर आभार प्रदर्शन युवा प्रशिक्षणार्थी शिक्षक श्री. प्रमोद महाजन यांनी केले .


अतिशय सुंदर बातमी !