मायेची सावली, आपुलकीचा सुवास – डिवायएसपी वासुदेव देसले व सुषमाताईंचा गजानन परिवाराचा केला सन्मान
![]()
मायेची सावली, आपुलकीचा सुवास – डिवायएसपी वासुदेव देसले व सुषमाताईंचा गजानन परिवाराचा केला सन्मान
अमळनेर प्रतिनिधी 🙁 ईश्वर महाजन)
अमळनेर येथील संत गजानन परिवारातील महिला भगिनी, महिला वारी प्रमुख ज्योतीताई पवार यांच्या नेतृत्वाखाली, त्र्यंबकेश्वर दर्शनासाठी नाशिकला गेल्या. या पवित्र प्रवासादरम्यान त्यांच्या सहकार्यची जबाबदारी स्वतः घेतली ती नाशिक ग्रामीणचे डिवायएसपी वासुदेव देसले साहेब आणि कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका, मा सरपंच सुषमाताई देसले यांनी……
घटना अशी घडली की, गजानन परिवारातील बारा महिला भगिनी नाशिकला पोहोचत असल्याची माहिती पत्रकार ईश्वर महाजन यांनी देसले साहेबांना संदेशाद्वारे दिली. त्या वेळी साहेबांची क्राईम संदर्भातील महत्त्वाची बैठक सुरू होणार होती, तरीही त्यांनी “मी पाहतो” असे आश्वासन दिले. बैठक संपताच त्यांनी तात्काळ ज्योतीताई पवार यांच्याशी संपर्क साधून संपूर्ण सहकार्य दिले.
फक्त दर्शनाची सोय करूनच थांबले नाहीत, तर सुषमाताई देसले यांनी प्रत्येक भगिनीला प्रेमाने जेवायला नेले. गप्पा-टप्पांच्या ओघात भगिनींच्या चेहऱ्यावर आनंदाची लाली खुलली. थकलेल्या कोणी निघून जाऊ नये, सर्वांनी समाधानाने भोजन करावे यासाठी ताई स्वतः लक्ष देत होत्या. त्यांच्या मायेच्या शब्दांत आणि आपुलकीच्या काळजीत खरी मानवीता झळकत होती.
संत गजानन महाराज सेवा संस्थानच्या विश्वस्त व महिला वारी प्रमुख ज्योतीताई पवार यांनी, “केवळ दर्शनाचीच नव्हे, तर रात्री जेवण करून आम्हाला सुखरूप रवाना केले. एवढ्या व्यस्त वेळापत्रकात आम्हाला दिलेले हे सहकार्य आम्ही कधीही विसरणार नाही,” अशा भावना व्यक्त केल्या.
देसले दांपत्यांच्या या सहृदय कृतीतून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा गाभा स्पष्ट दिसून येतो—पदापेक्षा मोठं मन, समाजासाठी धडधडणारं हृदय, आणि खरी लोकसेवा. गजानन परिवार व पत्रकार ईश्वर महाजन यांनी त्यांच्या या प्रेमळ सहकार्याला साष्टांग नमस्कार अर्पण केला.
काही क्षणचित्रे..





