पिंगळवाडे ग्रामपंचायतीत बाल संरक्षण समिती सक्षमीकरण कार्यशाळा उत्साहात पार  “बालकांचे हक्क जपणे, हीच खरी समाजाची प्रगती”
1 min read

पिंगळवाडे ग्रामपंचायतीत बाल संरक्षण समिती सक्षमीकरण कार्यशाळा उत्साहात पार “बालकांचे हक्क जपणे, हीच खरी समाजाची प्रगती”

Loading

पिंगळवाडे ग्रामपंचायतीत बाल संरक्षण समिती सक्षमीकरण कार्यशाळा उत्साहात पार

“बालकांचे हक्क जपणे, हीच खरी समाजाची प्रगती”

अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर तालुक्यातील ग्रामपंचायत पिंगळवाडे येथे दिनांक 13 ऑगस्ट 2025 रोजी आदिवासी विकास विभागाअंतर्गत महाराष्ट्र राज्य आदिवासी आश्रम शाळा स्तरावर बाल संरक्षण समिती स्थापन तसेच ग्राम बाल संरक्षण समिती सक्षमीकरण कार्यशाळा घेण्यात आली.
सावित्रीबाई फुले महिला मंडळ संस्था, बुलढाणा यांच्या वतीने मोबेलाईझर सौ. मनीषा बैसाणे यांनी कार्यशाळा घेतली. त्यांनी बालकांची काळजी व संरक्षण, त्यांचे हक्क व जबाबदाऱ्या, होणारे शोषण, अत्याचार, गैरवर्तवणूक, लैंगिक अत्याचार, बालविवाह रोखणे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेला सरपंचताई, उपसरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, माजी पोलीस पाटील, जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षक व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *