*ए.टी.झांबरे माध्यमिक विद्यालय जळगाव येथे राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा*
1 min read

*ए.टी.झांबरे माध्यमिक विद्यालय जळगाव येथे राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा*

Loading

*ए.टी.झांबरे माध्यमिक विद्यालय जळगाव येथे राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा*

पद्मश्री डॉ एस. आर. रंगनाथन यांच्या जयंती निमित्त राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा करण्यात आला.याप्रसंगी साहित्यिक श्री.निर्मल चतुर सर व विद्यालयाचे पर्यवेक्षकश्री.नरेंद्र पालवे यांच्याहस्ते पद्मश्री डॉ एस. आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले.
याप्रसंगी ग्रंथप्रदर्शन आयोजित करण्यात आले.सदर कार्यक्रमास विद्यालयातील शिक्षक व विद्यार्थ्यांनी भेट देऊन विविध ग्रंथाची माहिती जाणून घेतली. विद्यालयातील विद्यार्थ्यांनी तयार केलेले हस्तलिखित सुध्दा सादर करण्यात आले.सदर कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी स्वलिखीत साहित्य निर्माण करण्याचा संकल्प केला.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रंथपाल सौ.रोशनी कोळी
व शिक्षकेतर कर्मचारी ,विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *