पावसाच्या कवितेतून बरसलेली सृजनशक्ती — कवी मयुरी सूर्यवंशी यांचा बेंगळुरू येथे गौरव
1 min read

पावसाच्या कवितेतून बरसलेली सृजनशक्ती — कवी मयुरी सूर्यवंशी यांचा बेंगळुरू येथे गौरव

Loading

पावसाच्या कवितेतून बरसलेली सृजनशक्ती — कवी मयुरी सूर्यवंशी यांचा बेंगळुरू येथे गौरव

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) –
कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषद, बेंगळुरू विभाग आयोजित “पाऊस” या विषयावरील ऑनलाईन खुल्या काव्यस्पर्धेत अमळनेरच्या कवी पण  सध्या बंगलोरला नोकरी करणाऱ्या मयुरी सूर्यवंशी यांनी आपल्या प्रतिभेची मोहोर उमटवत गौरव प्रमाणपत्र मिळवले.

या सन्मानपत्रात पावसाचे वर्णन “सृष्टीचा निर्मिती उत्सव, मानवी सृजनतेस निसर्गाचा हुंकार आणि काव्यप्रतिभेला फुटणारे पंख” असे करत, मयुरी यांच्या कवितेतून हा पाऊस मुक्तपणे बरसल्याचे कौतुक करण्यात आले आहे. मराठी भाषेची गोडी लावणारे आणि विषयाला उत्स्फूर्तपणे न्याय देणारे काव्यलेखन केल्याबद्दल परिषदेने त्यांचे अभिनंदन केले.
सन्मानप्रदान सोहळ्यात परिषदेच्या अध्यक्षा सौ. दिपाली वझे, कोषाध्यक्ष श्री. तुषार भट आणि श्री. राकेश शेटे (कलबुरगी, बेंगळुरू विभाग) यांनी मयुरी यांना गौरव प्रमाणपत्र प्रदान केले.
कवी मयुरी सूर्यवंशी या अमळनेर येथील सार्वजनिक बांधकाम विभागातील श्री. धनंजय सूर्यवंशी यांच्या कन्या तर ग. स. बँकेचे सेवानिवृत्त शाखाधिकारी श्री. व्ही. एस. पाटील यांच्या स्नुषा आहेत. त्यांच्या या यशाबद्दल कुटुंबीय, साहित्यप्रेमी आणि अमळनेरवासीयांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *