गोरगावले आरोग्य केंद्रात प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानांतर्गत गरोदर व स्तनदा मातांची सखोल आरोग्य तपासणी
1 min read

गोरगावले आरोग्य केंद्रात प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानांतर्गत गरोदर व स्तनदा मातांची सखोल आरोग्य तपासणी

Loading

गोरगावले आरोग्य केंद्रात प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानांतर्गत गरोदर व स्तनदा मातांची सखोल आरोग्य तपासणी

चोपडा तालुका |
प्राथमिक आरोग्य केंद्र, गोरगावले बु येथे प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानांतर्गत गरोदर व स्तनदा मातांची मोफत व सखोल आरोग्य तपासणी करण्यात आली.
हा उपक्रम जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर, जिल्हा माता-बाल संगोपन अधिकारी डॉ. रमेश धापते यांच्या आदेशानुसार व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप लासुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला.
या अभियानाचा उद्देश गरोदर मातांचा वेळेत संपूर्ण वैद्यकीय तपास करून प्रसूतीदरम्यान होणारा धोका कमी करणे, तसेच माता व बाळाच्या मृत्यूचे प्रमाण घटविणे हा आहे. विशेषतः ग्रामीण व आदिवासी भागातील महिलांना रक्त तपासणी, सोनोग्राफी व इतर वैद्यकीय उपाययोजना वेळेआधी उपलब्ध करून देण्यात आल्या.
कार्यक्रमावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. मयुरेश माने, जिल्हा स्तरीय पर्यवेक्षक विजय देशमुख, आरोग्य सहाय्यक रविंद्र काटे व सुनील महाजन, आरोग्य सहायिका श्रीमती ज्योती न्हायदे, आरोग्य सेविका श्रीमती कल्पना सोनवणे, आरोग्य सेवक आशिष लोसरवार, अनिल माळी तसेच आशा सेविका उपस्थित होत्या.
तपासणीत उंची, वजन, रक्तातील हिमोग्लोबिन, साखरेचे प्रमाण, उच्च रक्तदाब, HIV चाचणी यांसह संपूर्ण वैद्यकीय परीक्षण झाले. हाय रिस्क गरोदर मातांना मोफत सोनोग्राफीसाठी संदर्भित करण्यात आले. याशिवाय आहार, स्तनपान व लसीकरणाविषयी मार्गदर्शनही देण्यात आले.
📌 या उपक्रमामुळे ग्रामीण व आदिवासी भागातील अनेक महिलांना योग्य वेळी उपचार मिळून सुरक्षित मातृत्व साध्य होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *