वीर एकलव्य स्मारकाजवळ पूजनाने कळमसरेत साजरा जागतिक आदिवासी दिन
![]()
वीर एकलव्य स्मारकाजवळ पूजनाने कळमसरेत साजरा जागतिक आदिवासी दिन
अमळनेर प्रतिनिधी
दि. 9 ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिनानिमित्ताने ग्रामपंचायत कळमसरे येथे जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला. यावेळी सरपंच जगदीश निकम, उपसरपंच जितेंद्रसिंग पाटील यांच्या हस्ते वीर एकलव्य व बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रीफळ वाहण्यात आले.
यावेळी ग्रामपंचायतीच्या वतीने नवीन बांधण्यात आलेल्या वीर एकलव्य यांच्या स्मारकाच्या जवळ देखील पूजन करण्यात आले. तसेच समस्त आदिवासी बांधवांकडून वीर एकलव्य यांची प्रतिमा ग्रामपंचायतीस भेट स्वरूपात देण्यात आली. आदिवासी बांधवांसाठी ग्रामपंचायत सदैव तत्पर असून त्यांच्या विकासासाठी ग्रामपंचायत नेहमी प्रयत्नशील राहणार असे प्रतिपादन यावेळी सरपंच व उपसरपंच यांनी केले. यावेळी ग्राम पंचायत अधिकारी श्री ज्ञानेश्वर पाटील तसेच विलास भिल, समाधान भिल, आनंदा भिल, संतोष सोनवणे, गणेश भिल,बबलू भिल,किरण भिल,कृष्णा भिल,राजू भिल, सागर भिल, धनराज भिल, तसेच समस्त आदिवासी बांधव सदर कार्यक्रमास हजर होते..

