“सार्वजनिक विद्यालय असोदा येथे रक्षाबंधनात सामाजिक व पर्यावरणाचा संदेश”
1 min read

“सार्वजनिक विद्यालय असोदा येथे रक्षाबंधनात सामाजिक व पर्यावरणाचा संदेश”

Loading

**सार्वजनिक विद्यालयात रिक्षा चालक बांधवांना विद्यार्थिनींनी बांधल्या राख्या रोटरी इंटरॅक्ट क्लब अंतर्गत रक्षाबंधनाचा व राखी प्रदर्शनाच्या कार्यक्रमाचे आयोजन **

जळगांव प्रतिनिधी

रक्षाबंधन सणाच्या वेळी बहिणीने भावाकडून घेतलेले रक्षणाचे वचन हे भाऊ बहिणीचे अतूट नात्याचे प्रतीक आहे. असे उद्गार सर्वोदय एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अनिल महाजन यांनी सार्वजनिक विद्यालय असोदा येथे साजरा झालेल्या रक्षाबंधनाच्या कार्यक्रमाप्रसंगी बोलताना व्यक्त केले. विद्यार्थी विद्यार्थिनींनी बनवून आणलेल्या राख्यांचे प्रदर्शन आयोजित केले गेले. प्रदर्शनाचे उद्घाटन संस्थेचे सचिव विलास चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले मुलांनी खूप सुंदर राख्या बनवल्या होत्या.या प्रसंगी रिक्षाचालक बांधव प्रविण बऱ्हाटे,युवराज सपकाळे,देवानंद भालेराव, शेतकरी किशोर नारखेडे, सफाई कर्मचारी गणेश म्हस्के यांना शाळेत आमंत्रित करून विद्यार्थिनींनी त्यांना राख्या बांधल्या तसेच विद्यार्थिनींनी झाडांना देखील राख्या बांधून झाडांच्या संरक्षणाची शपथ घेतली या कार्यक्रमाला संस्थेचे सचिव विलास चौधरी, मुख्याध्यापक डॉ. मिलिंद बागुल ज्येष्ठ शिक्षिका मंगला नारखेडे ,पर्यावरण प्रमुख गोपाळ महाजन, शुभांगीनी महाजन,भावना चौधरी महाजन व सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कविता भोळे यांनी केले इंटरऍक्ट क्लब अध्यक्ष मोहिनी पाटील या विद्यार्थिनीने आपले मनोगत यावेळी व्यक्त केले. आभार मीनाक्षी कोल्हे यांनी मानले त्यांनी राखी प्रदर्शनाचे उत्कृष्ट नियोजन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *