वाढदिवस साजरा करतांना सामाजिक बांधिलकीचे दर्शन – डॉ. सचिन बडगुजर यांच्याकडून विशेष दिव्यांग मुलांना मदतीचा हात
1 min read

वाढदिवस साजरा करतांना सामाजिक बांधिलकीचे दर्शन – डॉ. सचिन बडगुजर यांच्याकडून विशेष दिव्यांग मुलांना मदतीचा हात

Loading

वाढदिवस साजरा करतांना सामाजिक बांधिलकीचे दर्शन – डॉ. सचिन बडगुजर यांच्याकडून विशेष दिव्यांग मुलांना मदतीचा हात

अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन )– सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवत वाढदिवस साजरा करण्याचा आदर्श डॉ. सचिन बडगुजर (डेंटिस्ट, पारोळा) यांनी घालून दिला आहे. दिनांक ०७ ऑगस्ट २०२५ रोजी गुरुवार वार, चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसर, धुळे संचलित परिश्रम दिव्यांग मुला-मुलींची निवासी शाळा, पारोळा येथे त्यांच्या सुपुत्र चि. मंथन सचिन बडगुजर (शिक्षण – इंजिनियरिंग, पुणे) यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अनोखा उपक्रम राबवण्यात आला.
या प्रसंगी आप्पासाहेब उमेश करोडपती (संस्थापक अध्यक्ष, बालाजी विद्या प्रबोधिनी मंडळ, पारोळा) यांच्या हस्ते शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मिष्ठान्न खाऊचे वाटप करण्यात आले तसेच ५० किलो तांदुळाची मदत शाळेला देण्यात आली.
कार्यक्रमादरम्यान आप्पासाहेब उमेश करोडपती यांचे स्वागत डॉ. योगेश महाजन (अध्यक्ष, संस्थेचे) यांच्यावतीने शाळेचे शिक्षक रामकृष्ण शेलकर सर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी दीपक भावसार, राहुल शिंदे तसेच शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
या उपक्रमामुळे मुलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला असून, वाढदिवस साजरा करण्याचा हा सामाजिक दृष्टिकोन सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *