ज्ञान, तंत्रज्ञान आणि अध्यात्माचा संगम – ए.टी. झांबरे विद्यालयाची प्रेरणादायी क्षेत्रभेट!
1 min read

ज्ञान, तंत्रज्ञान आणि अध्यात्माचा संगम – ए.टी. झांबरे विद्यालयाची प्रेरणादायी क्षेत्रभेट!

Loading

ज्ञान, तंत्रज्ञान आणि अध्यात्माचा संगम – ए.टी. झांबरे विद्यालयाची प्रेरणादायी क्षेत्रभेट!

जळगांव प्रतिनिधी

दिनांक 6 ऑगस्ट 2025 रोजी ए टी झांबरे माध्यमिक विद्यालयातील 45 विद्यार्थी आणि 7 शिक्षक यांची इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायंटिफिक एज्युकेशन अँड रिसर्च (आयसर) पुणे* या ठिकाणी शैक्षणिक क्षेत्रभेट आयोजित केली होती.

सदर शैक्षणिक क्षेत्र भेटी दरम्यान आयसर मधील इंद्राणी बालन सायन्स ऍक्टिव्हिटी सेंटर मध्ये विद्यार्थ्यांनी शालेय विज्ञान आणि गणितावर आधारित हँड्स ऑन ऍक्टिव्हिटी गणित आणि विज्ञानाच्या संकल्पना अभ्यासल्या.

राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 मध्ये नमूद STEAM EDUCATION च्या अनुषंगाने विद्यार्थ्यांनी गणित आणि विज्ञानाच्या संकल्पना छोटे छोटे आणि साधे प्रयोग करून अभ्यासल्या.

तसेच आयसर मधील विविध प्रयोगशाळांना भेटी देऊन त्याठिकाणी असलेली अत्याधुनिक उपकरणे पाहिली.

आयसर मधील विविध विभागांना भेट देऊन त्याठिकाणाची माहिती आणि कार्यपद्धती जाणून घेतली. तेथील शास्त्रज्ञांशी मनमोकळ्या गप्पा करुन विविध शंका विचारल्या.

जळगाव जिल्ह्यातील मस्कावद या छोट्या खेडेगावातील एन सी एल मध्ये *नॅनो पार्टिकल* वर संशोधन करणाऱ्या हेमांगी चौधरी या संशोधिकेने आजवरच्या वाटचालीतील अनुभव शेअर करुन नॅनो पार्टिकल बाबत विद्यार्थ्यांशी चर्चा केली.

सोबत माननीय Shri Sanjiv Sanyal (Member of Economic Advisory Council to Prime Minister) यांचे Process Reforms या विषयावरील अतिशय सुंदर व्याख्यानाचा लाभ विद्यार्थ्यांना मिळाला.

सदर क्षेत्र भेटी दरम्यान आयसर मधील डाॅ अशोक रुपनर, अंकिश तिरपुडे, संकेत सर आणि त्यांची संपूर्ण टिमचे मार्गदर्शन लाभले.

सदर क्षेत्र भेटी सोबत बुद्धीची देवता असलेल्या अष्टविनायकांपैकी रांजणगाव येथील महागणपती आणि थेऊर येथील चिंतामणी या देवस्थानाला भेट देऊन गणपती बाप्पा चे दर्शन घेतले.

अध्यात्म, शिक्षण, तंत्रज्ञान आणि संशोधन याच सुंदर मिलाप या क्षेत्र भेटीच्या निमित्ताने विद्यार्थी आणि शिक्षकांनी अनुभवला.

क्षेत्रभेटी साठी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका आदरणीय प्रणिता झांबरे यांनी प्रेरणा दिली. त्यानुसार विद्यालयातील उपक्रमशील जेष्ठ शिक्षक श्री महेंद्र नेमाडे आणि डी.ए.पाटील यांनी नियोजन केले होते.

क्षेत्रभेटी दरम्यान विद्यालयातील पर्यवेक्षक श्री नरेंद्र पालवे, श्री महेंद्र नेमाडे, सौ पुनम कोल्हे, सौ रोहिणी पाटील, श्री धिरज चौधरी, सौ नुतन वराडे, सौ दिपाली खडके विद्यार्थ्यांसोबत उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *