गावगाड्यांच्या प्रश्नांवर मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक — सरपंच परिषदेच्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद
![]()
गावगाड्यांच्या प्रश्नांवर मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक — सरपंच परिषदेच्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद
अमळनेर प्रतिनिधी
ग्रामविकास विभागाच्या वतीने गावगाड्यांच्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी दिनांक ६ ऑगस्ट रोजी मंत्रालय, मुंबई येथे ग्रामविकास मंत्री मा. ना. श्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक पार पडली.
या बैठकीस सरपंच परिषद महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष मा. दत्ताभाऊ काकडे (बीड) यांच्या नेतृत्वाखाली विविध जिल्ह्यांतील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यात श्री. आबासाहेब सोनवणे, श्री. राजाराम पोतनीस, श्री. आनंद जाधव, श्री. किसन जाधव, सौ. सुषमाताई देसले पाटील, श्री. महेंद्र बोरसे, सौ. प्रियंका जाधव, सौ. निकिता रानवडे आदींचा समावेश होता.
बैठकीदरम्यान महिला पदाधिकाऱ्यांनी मा. मंत्री महोदयांना राखी बांधून रक्षाबंधन साजरा केले. त्यानंतर सरपंच भवन उभारणी, सरपंच/उपसरपंच मानधन निधी, गावठाण विस्तार, वीज, पाणी, ग्रामसेवक व अन्य कर्मचाऱ्यांचे समन्वयित कामकाज यासह २० प्रमुख मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
मा. गोरे साहेबांनी सर्व मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देत संबंधित सचिवांना तातडीने कार्यवाहीचे आदेश दिले. तसेच, सरपंच परिषद करत असलेल्या विधायक कार्याचे त्यांनी विशेष कौतुक केले.


