बालतस्करीविरोधी जनजागृतीसाठी इसार संस्थेचा उपक्रम* *वडद येथील जिजामाता शाळेत जागतिक मानव तस्करी विरोधी दिन साजरा*
![]()
*बालतस्करीविरोधी जनजागृतीसाठी इसार संस्थेचा उपक्रम*
*वडद येथील जिजामाता शाळेत जागतिक मानव तस्करी विरोधी दिन साजरा*
इन्स्टिट्यूट ऑफ सोशल अवेअरनेस अँड रिफॉर्म (इसार) या संस्थेच्या वतीने Access to Justice प्रकल्पाअंतर्गत जागतिक मानव तस्करी विरोधी दिना निमित्त वडद येथील जिजामाता उच्च माध्यमिक विद्यालयात दिनांक 6 ऑगस्ट रोजी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या उपक्रमात बालतस्करी, बालविवाह आणि बाल लैंगिक शोषण यासारख्या गंभीर विषयांवर विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांना जागरूक करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आपल्या अनुभवातून या विषयावर मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाला जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे, CWC सदस्य परसराम हेम्बाडे, दामिनी पथकाच्या आरती सावळे, उमंग शिशुगृहाचे राहुल शिरसाट, वडद शिक्षण संस्थेचे संचालिका सौ. दीपा संदीप देवरे, मुख्याध्यापक संदीप देवरे, वडद गावाच्या सरपंच नलिनीताई पाटील, एकंबा गावाचे सरपंच प्रल्हाद शिंदे, इसार संस्थेचे संचालक श्री. दिवाकर भोयर, प्रकल्प व्यवस्थापक श्री. मिथुन कांबळे, अंगणवाडी सेविका उषा पाटील, तसेच शाळेतील शिक्षकवृंद, पालक, ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक इसार संस्थेच्या प्रकल्प समन्वयक सौ. अनिता भगत यांनी केले. सूत्रसंचालन विलास कुर्हाळे सर यांनी तर आभार प्रदर्शन इसारचे जिल्हा समन्वयक श्री. देविदास खरात यांनी केले.
प्रत्येक विभागाच्या प्रतिनिधींनी बालतस्करी, बालविवाह व शोषणाच्या मुद्द्यांवर आपली मते मांडून उपस्थितांना सजग राहण्याचे आवाहन केले.
या जनजागृती उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये बालहक्कांविषयी जागरूकता निर्माण झाली असून, समाजातही सजगतेची भावना वाढीस लागली असल्याचे मत शिक्षक व पालकांनी व्यक्त केले.

