सहकार म्हणजे एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवून पुढे जाणे होय- विश्वास थळे माणसाच्या आयुष्यामध्ये जर त्याच्या जीवनाची प्रगती करायची असेल तर सहकारा शिवाय तरणोपाय नाही-शिवाजीराव शिंदे सह्याद्री नागरी पतसंस्थेची 33 वी वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न!
![]()
सहकार म्हणजे एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवून पुढे जाणे होय- विश्वास थळे
माणसाच्या आयुष्यामध्ये जर त्याच्या जीवनाची प्रगती करायची असेल तर सहकारा शिवाय तरणोपाय नाही-शिवाजीराव शिंदे
सह्याद्री नागरी पतसंस्थेची 33 वी वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न!
ठाणे: कल्याण (मनिलाल शिंपी)
भिवंडी तालुक्यातील अग्रगण्य संस्था म्हणून नावारूपाला आलेल्या सह्याद्री नागरी सहकारी पतसंस्थेची 33 वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक 3/ 8/ 2025 रोजी शांती चंदन सभागृह ओसवाल हायस्कूल अंजुरफाटा येथे मोठ्या उत्सापूर्ण वातावरणात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सहकार महर्षी श्री.विश्वास थळे यांच्या
अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कोकण विभागीय नागरी पगारदार पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष तथा ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकचे
माजी अध्यक्ष श्री.शिवाजीराव शिंदे, अंतर्गत लेखापरीक्षक तथा कोकण विभागीय नागरी पगारदार पतसंस्था फेडरेशनचे संचालक श्री.नितीन. डी.पाटील,दैनिक स्वराज्य तोरणचे संपादक-डाॅ.श्री.किशोर बळीराम पाटील, मासाहेब पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री.मदन (अण्णा) पाटील, श्री सखी महिला पतसंस्थेच्या संचालिका सौ. वैजयंती विश्वास थळे, श्री.नरेंद्र पाटील, ॲड.संध्या भोईर, आदी मान्यवर संचालक, कर्मचारी वर्ग, दैनंदिन ठेव प्रतिनिधी व मोठ्या संख्येने सभासद वर्ग उपस्थित होते.
33 वर्षात एवढे आकडे पुढे जातील अशी मलाही कल्पना नव्हती. एक सर्व सामान्य दैनंदिन प्रतिनिधी श्री. श्याम जाधव याला वर्षाला त्यांनी केलेल्या मेहनतीचे 18 लाख रुपये मिळतात.
हे सर्व कसं शक्य झालं तर आपण एकत्र आलो म्हणून, विशेष म्हणजे ज्या सुविधा कोणी देत नाही त्या आपण देण्याचा प्रमाणिक प्रयत्न करत असतो. कर्ज देताना आईच्या मायेने द्या! वसूल करताना बापाच्या धाकाने वसूल करा! असे सहकारा मध्ये दोन मुद्दे आहेत. 31 वर्ष आम्ही माया पेरत आलो आणि एवढी माया पेरली की त्या मायेच्या वाफेतून कडवटपणा जाणवायला लागला,
आणि तो कडवटपणा जाणवता जाणवता बापाचं धाक आमच्या हातात उमेश सोनवणे या माणसाच्या रूपाने मिळालं, आता मी कर्जदारांना सांगायला लागलो आहे की, जिथे माझे अधिकार संपतात तिथे उमेश सोनवणे यांचे अधिकार सुरू होतात. माझ्या हह्याती मधे जशी संस्था सुरू आहे,तशी मी नसतांनाही सुरू राहील. ही संस्था चालवणारी माणसं निर्माण झाली पाहिजेत त्यासाठी संगत ही चांगल्या माणसांशी करावी.
मित्रांनो सहकार म्हणजे एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवून पुढे जायाचे आहे, एकाने दुसऱ्याला पुढे ओढायचे आहे, त्याचे पाय मागे ओढायचे नाहीत. कारण जो काय आपण जगन्नाथाचा रथ ओढवलेला आहे, तो भविष्यात आपल्या पश्चात हा रथ ओढवणारी माणसे तयार करायला पाहिजेत, ती माणसं निर्माण व्हायला पाहिजेत, आणि म्हणून प्रत्येकाने एकमेका कडून काहीतरी शिकले पाहिजे, एकमेकांबद्दल आपल्या मनामध्ये दुश्वास नसावा फक्त विश्वास असावा तरच आपला श्वास एकरूप होतो. तेव्हाच माणूस खूप पुढे जातो असे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना संस्थापक अध्यक्ष विश्वास थळे यांनी सांगितले.
वार्षिक सभेमध्ये बोलण्याचा अधिकार फक्त सभासदांना असतो. त्याचं कारण असं आहे की 364 दिवस आपण सर्व मंडळी काम करत असतो व 365 वाढदिवस हा सभासदांचा असतो. वार्षिक सभेला संख्या कमी दिसते त्यावेळी असे समजले जाते की, वर्षभर तुम्ही जे काम करता त्या कामाला आमचा संपूर्ण पाठिंबा आहे. मित्रांनो माणसाच्या आयुष्यामध्ये जर त्याच्या जीवनाची प्रगती करायची असेल तर सहकारा शिवाय तरणोपाय नाही.
सहकार म्हणजे नेमकं काय! सहकाराचा जन्म कुठे झाला? सहकाराची व्याप्ती काय! याचा सर्वसाधारणपणे सहकारात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी अभ्यास केला पाहिजे हे माझं स्वतःचं मत आहे.दुसऱ्या महायुद्धाच्या काळात इंग्लंडमध्ये 1902 साली सहकाराचा जन्म झाला. 1902 ला रॉबर्ट वरली यांनी सहकाराची स्थापना केली. त्यामुळे तो सहकाराचा जनक म्हणून ओळखला जातो. 1902 नंतर सहकाराची वाढ झाली आणि 1912 ला सहकार हिंदुस्थानामध्ये आला व 1913 ला पेतपेढ्यांची (पतसंस्थांची) सुरुवात झाली. पतसंस्थांची निर्मिती का करावी लागली याचा इतिहास मी तुम्हाला सांगतो. एक काळ असा होता की आपला गरीब शेतकरी ज्याला आपण देशाचा कणा म्हणतो, त्या काळात हा शेतकरी सावकाराकडून कर्ज घेत असे व त्या कर्जाची परतफेड त्यांचं धान्य तयार झाल्यानंतर परत करत असे, त्यावेळी सावकार आलगून, फाल्गुन, शिमगा आणि होळी
असे एकाच महिन्याचे चार महिने सांगून शेतकऱ्यांची फसवणूक करत असे, व ही गोष्ट ज्यावेळी कोल्हापूरच्या छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या लक्षात आली की, माझा शेतकरी लुबाडला जातो आहे म्हणून 1913 ला कोल्हापूर मध्ये अर्बन पतपेढीची स्थापना केली व या पतपेढीचे संचालक दुसरे कोणी नसून साधे बारा बलुतेदार होते. सामान्यातल्या सामान्य माणसाला संचालक करून सहकाराची सुरुवात 1913 ला छत्रपती शाहू महाराज यांनी कोल्हापूर मध्ये केली. आज तीच संस्था अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक शेड्युल बँक म्हणून कोल्हापुरात दिमाखात उभी आहे. त्यानंतर हळु- हळु विखे पाटील, यशवंतराव चव्हाण,व वसंत दादा पाटील या राजकीय मंडळींनी महाराष्ट्रात सहकाराची मुहूर्तमेढ रोवली. सहकाराचे वैशिष्ट्य फार मोठं आहे,जसे प्रत्येक पक्षाला झेंडा असतो तशाच प्रकारचा सहकाराचा देखील झेंडा आहे, या झेंड्याची निर्मिती अतिशय कल्पकतेने केली आहे, या झेंड्यामध्ये इंद्रधनुष्याचे सात रंग आहेत. सहकाराच्या झेंड्याचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे त्या सहकाराच्या झेंड्याला काठी नाही. पक्षाच्या झेंड्याला काठी असते काहीतरी विपरीत प्रकार घडला की, त्या झेंड्याची काठी काढून त्या काठीचा वापर वेगळ्या प्रकारे केला जातो. असा वापर होऊ नये म्हणून सहकाऱ्याच्या झेंड्याला काठी नसते असे मार्मिक शब्दात मुद्देसूतपणे मार्गदर्शन करताना कोकण विभागीय नागरी पगारदार पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष शिवाजीराव शिंदे यांनी यावेळी सांगितले.
33 वी वार्षिक सर्वसाधारण सभा
यशस्वी करण्यासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सहकार महर्षी श्री.विश्वास काळू थळे, उपाध्यक्ष डॉ.अरूण पाटील,संचालक श्री.देवराज किसन म्हात्रे,डॉ. प्रमोद मारुती पाटील,श्री.सुदाम नामा भोईर,सौ. स्नेहा सुरेश कारेकर,सौ. सुरेखा सोनबा जाधव,श्री.चक्रधरी मगन पाटील, श्री.मोहन लक्ष्मण गायकवाड, मुख्य कार्यकारी अधिकारी अँड.संजय यशवंत पाटील,शाखाधिकारी शिवाजीनगर सौ.अनिता चंद्रकांत ताटे, शाखाधिकारी पडघा श्री. दिलीप काशिनाथ पाटील, शाखाधिकारी मानकोली श्री. मेननाथ कृष्णा भोईर, शाखाधिकारी टेमघर सौ.संगीता किशोर पाटील, शाखाधिकारी सावद श्री.अनंता जैतु पाटील, शाखाधिकारी खडवली श्री. संजय रमेश पाटील, शाखाधिकारी अंबाडी श्री. विजय गोपीनाथ पाटील, तसेच कर्मचारी वर्ग व दैनंदिन ठेव प्रतिनिधी यांनी विशेष मेहनत घेतली सांगता राष्ट्रगीताने झाली.

