साहित्य, पत्रकारिता आणि सामाजिक बांधिलकीचा गौरव ,पत्रकार उत्कर्ष संघाच्या उपाध्यक्षपदी राष्ट्रपती पुरस्कार विजेते डॉ. खंडू माळवे यांची बहुमताने निवड
1 min read

साहित्य, पत्रकारिता आणि सामाजिक बांधिलकीचा गौरव ,पत्रकार उत्कर्ष संघाच्या उपाध्यक्षपदी राष्ट्रपती पुरस्कार विजेते डॉ. खंडू माळवे यांची बहुमताने निवड

Loading

साहित्य, पत्रकारिता आणि सामाजिक बांधिलकीचा गौरव

पत्रकार उत्कर्ष संघाच्या उपाध्यक्षपदी राष्ट्रपती पुरस्कार विजेते डॉ. खंडू माळवे यांची बहुमताने निवड

मुंबई  प्रतिनिधी

कवी, लेखक, साहित्यिक, वृत्तपत्र लेखक तसेच मुक्त पत्रकारांच्या हक्कांसाठी आणि सृजनशील कार्याला व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या पत्रकार उत्कर्ष संघ (रजि.) च्या उपाध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक, मुक्त पत्रकार आणि राष्ट्रपती पुरस्कार विजेते डॉ. खंडू रघुनाथ माळवे यांची बहुमताने निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे साहित्य, पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.

कामाठीपुरा विभागातील श्री दत्तगुरू प्रतिष्ठान सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या विशेष सभेत ही निवड प्रक्रिया पार पडली. या सभेचे अध्यक्षस्थान संघाचे सल्लागार श्री. लियाखत अल्ला सय्यद यांनी भूषविले. सभेच्या प्रारंभी अध्यक्षीय मार्गदर्शनासह संघाच्या उद्दिष्टांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

कार्यक्रमाचे प्रभावी प्रास्ताविक राजेंद्र लकेश्री यांनी केले. यावेळी स्वरचंद्रिका आशाताई भोसले, संघाचे सदस्य प्रकाश बाडकर, बबन जोशी, हरियाणा, गणेश नेतिकर आदी दिवंगत सदस्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सभागृहात यावेळी भावनिक वातावरण निर्माण झाले होते.

त्यानंतर रीतसर कार्यकारिणी निवड प्रक्रिया पार पडली. संघाच्या अध्यक्षपदी राजेंद्र लकेश्री यांची निवड करण्यात आली, तर उपाध्यक्षपदी डॉ. खंडू माळवे आणि मुक्ताताई फोपेरे यांची निवड जाहीर करण्यात आली.

तसेच संघाच्या सरचिटणीसपदी दत्ताराम वंजारे, चिटणीसपदी राजेश्वर जोगूशाहिद मुल्ला, खजिनदारपदी अशोक परब यांची निवड करण्यात आली. हिशोब तपासणीसाठी भाबय्या गुंडावैना यांची नियुक्ती करण्यात आली.

संघाच्या कार्यकारिणी सदस्य म्हणून रामदास गजरे, हेमंत अनुमाला, भालचंद्र डफल, वसंत चिलवेरी आणि विश्वनाथ भ. तळेकर यांची पुढील तीन वर्षांसाठी एकमताने निवड करण्यात आली.

डॉ. खंडू माळवे हे साहित्य, पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा आणि अभ्यासू व्यक्तिमत्त्वाचा लाभ पत्रकार उत्कर्ष संघाच्या कार्याला निश्चितच होणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

कार्यक्रमास पत्रकार, साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते आणि संघाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *