शिवनेरी नागरी सहकारी पतसंस्थेची 21 वी वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न
![]()
शिवनेरी नागरी सहकारी पतसंस्थेची 21 वी वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न!
ठाणे: कल्याण
(मनिलाल शिंपी)
भिवंडी तालुक्यातील उंच भरारी घेत असलेली संस्था म्हणून नावारूपाला आलेल्या शिवनेरी नागरी सहकारी पतसंस्थेची 21 वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार दिनांक 2/ 8/ 2025 रोजी संस्थेचे मुख्य कार्यालय खारबाव येथे मोठ्या उत्सापूर्ण वातावरणात संस्थेच्या अध्यक्षा सौ.दमयंती कमलाकर तांगडी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे संस्थापक श्री.कमलाकर आत्माराम तांगडी, अंतर्गत लेखापरीक्षक तथा कोकण विभागीय नागरी पगारदार पतसंस्था फेडरेशनचे संचालक श्री.नितीन. डी.पाटील,दैनिक स्वराज्य तोरणचे संपादक-डाॅ.श्री.किशोर बळीराम पाटील,बालनाथ पाटील, आदी मान्यवर संचालक, कर्मचारी वर्ग, दैनंदिन ठेव प्रतिनिधी व सभासद वर्ग उपस्थित होते.
सहकार महर्षी श्री. विश्वास थळे
यांच्या मार्गदर्शनाने 2004 साली या पतसंस्थेची स्थापना एका छोटे खाणी गाल्यामध्ये केली.
आज या संस्थेचे रूपांतर खरोखरच वटवृक्षात झाले आहे असे म्हणायला वावंग ठरवू नये, आता ही संस्था नसून आमचं एक कुटुंब तयार झाला आहे त्यामुळे आम्ही सर्व या संस्थेची कुटुंबाचे सदस्य म्हणून एकत्रपणे काम करत आहोत आमच्या संस्थेमध्ये कोणत्याही प्रकारचा पक्षीय राजकारण नाही. सहकाराच्या उद्देशाने आम्ही सर्व एक झाले आहोत. असे संस्थापक तथा माजी अध्यक्ष श्री. कमलाकर तांगडी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले.
या विशेष वार्षिक सर्वसाधारण सभेत संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ॲड. शिवाजी सखाराम भोईर व मुख्य कार्यालय शाखाधिकारी ॲड. गणेश सुरेश म्हात्रे यांनी संस्थेत प्रामाणिकपणे काम करत असताना कायद्याचे शिक्षण (एलएलबी) पूर्ण केल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार सन्मान चिन्ह व मानपत्र देऊन संस्थेच्या वतीने करण्यात आला. त्याचप्रमाणे सर्व संचालक मंडळाने पतसंस्थेसाठी विशेष योगदान दिल्यामुळे त्यांचाही सर्वांचा सन्मान उपस्थित प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह व मानपत्र देऊन करण्यात आला.
21वी वार्षिक सर्वसाधारण सभा यशस्वी करण्यासाठी संस्थेच्या अध्यक्षा सौ.दमयंती कमलाकर तांगडी, उपाध्यक्ष श्री.महादेव नवशा हांडवा, संचालक श्री.गुरुनाथ सखाराम म्हात्रे,श्री.विनोद गंगाराम म्हात्रे ,श्री.प्रवीण गोविंद पाटील, श्री.मंगलदास चांगो म्हात्रे, श्री.कमलाकर शंकर खारखंडी, श्री.रतिलाल जगन्नाथ नाईक, अमृत नारायण देवळीकर, सौ.सुनीता भालचंद्र म्हात्रे, तज्ञ संचालक श्री.अविनाश दिनकर पाटील, श्री.जय जगन्नाथ पाटील, श्री.योगेश चंद्रकांत म्हात्रे (सल्लागार) मुख्य कार्यकारी अधिकारी ॲड.शिवाजी सखाराम भोईर, मुख्य कार्यालय शाखाधिकारी ॲड.गणेश सुरेश म्हात्रे,शाखाधिकारी कोपर सौ.उज्वला खुशाल गुळवी, शाखाधिकारी बापगाव श्री. किरण काळूराम पाटील कर्ज विभाग अधिकारी श्री.विशाल रमेश नाईक ,रोखपाल प्राची बबन भोईर, लिपिक देवेंद्र रविकांत म्हात्रे, लिपिक सौ.जागृती मानेश घरत व दैनंदिन ठेव प्रतिनिधी यांनी विशेष मेहनत घेतली. या संपूर्ण वार्षिक सभेचे सूत्रसंचालन मुख्य कार्यकारी अधिकारी ॲड.शिवाजी सखाराम भोईर यांनी केले तर आभार प्रदर्शन मुख्य कार्यालय शाखाधिकारी ॲड.गणेश सुरेश म्हात्रे यांनी केले.

