नवीन माध्यमिक विद्यालयात लोकशाहीरांचा जागर – जयंती-पुण्यतिथीतून विचारांचे बीजारोपण   ,नवीन माध्यमिक विद्यालय व माता बिजासनी आश्रमशाळा अंतुर्ली येथे अण्णाभाऊ साठे–टिळक अभिवादन सोहळा उत्साहात”
1 min read

नवीन माध्यमिक विद्यालयात लोकशाहीरांचा जागर – जयंती-पुण्यतिथीतून विचारांचे बीजारोपण ,नवीन माध्यमिक विद्यालय व माता बिजासनी आश्रमशाळा अंतुर्ली येथे अण्णाभाऊ साठे–टिळक अभिवादन सोहळा उत्साहात”

Loading

नवीन माध्यमिक विद्यालयात लोकशाहीरांचा जागर – जयंती-पुण्यतिथीतून विचारांचे बीजारोपण

नवीन माध्यमिक विद्यालय व माता बिजासनी आश्रमशाळा अंतुर्ली येथे अण्णाभाऊ साठे–टिळक अभिवादन सोहळा उत्साहात”

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
युवा कल्याण प्रतिष्ठान, अमळनेर संचलित राष्ट्रीय विचार प्रबोधन अभियान अंतर्गत, प्रा. अशोक पवार सर यांच्या सहकार्याने अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्ताने प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हे कार्यक्रम नवीन माध्यमिक विद्यालय, अंतुर्ली व माता बिजासनी अंतुर्ली आश्रमशाळा येथे संपन्न झाले.
नवीन माध्यमिक विद्यालयात कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. आर. बी. पाटील होते. प्रमुख पाहुणे व वक्ते म्हणून मा. केंद्रप्रमुख आबासाहेब गोकुळ पाटील यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन सुभाष पाटील यांनी तर आभार प्रदर्शन गुलाबराव पाटील यांनी केले.
माता बिजासनी आश्रमशाळेत अध्यक्षस्थानी मुके सर होते. सूत्रसंचालन पावरा सर यांनी केले. आभारप्रदर्शन श्री. मनोहर पाटील यांनी केले.
या दोन्ही ठिकाणी आबासाहेब गोकुळ पाटील यांनी विचारमंथन करताना सांगितले की,
“जयंती व पुण्यतिथी नाचून नव्हे, वाचून व विचारांनी साजरी व्हावी. या दिवशी जर त्या नेत्यांचे विचार आत्मसात केले, तरच हा साजरा खऱ्या अर्थाने सार्थ होईल.”
अण्णा भाऊ साठे यांचे थोर कार्य:
तुकाराम भाऊराव साठे ऊर्फ लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे जीवन म्हणजे संघर्ष, प्रेरणा आणि साहित्याने सामाजिक क्रांती घडवण्याचा प्रवास! जन्म वाटेगाव, जिल्हा सांगली (१९२०), मृत्यू – १९६९. अक्षरशत्रू असूनही प्रबळ इच्छाशक्तीने प्रौढ शिक्षण घेतले. बालपणापासून संघर्ष करत, 320 मैल पायी चालत मुंबईत आले. गिरणीत मजुरी करत समाजाशी नाळ जुळवली.
अण्णाभाऊंनी ३५ कादंबऱ्या, १५ लघुकथा संग्रह, १२ पटकथा, ७ लोकनाट्य, कितीतरी पोवाडे व गवळणीतून अन्यायाला वाचा दिली. त्यांच्या “वारणेचा वाघ” या कादंबरीवर यशस्वी चित्रपटही प्रदर्शित झाला. रशियात त्यांच्या साहित्याचा सन्मान झाला. शिवाजी महाराजांवर लिहलेला पोवाडा रशियन भाषेत अनुवादित होऊन गाजला.
“शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संदेश त्यांनी लेखणीच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवला. संयुक्त महाराष्ट्र चळवळीपासून गोवा मुक्ती संग्रामापर्यंत त्यांनी जनजागृती घडवून आणली.
कार्यक्रमाची यशस्वीता:
या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सुभाष पाटील, गुलाबराव पाटील, मंगलाताई पाटील, शैलाताई बैसाणे, साळुंखे मॅडम, प्रवीण पाटील, मनोहर पाटील, साळुंखे सर, पावरा सर, संदीप उघडे सर, भगवान पाटील, नानाभाऊ आदींचे मोलाचे सहकार्य लाभले.
“लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आणि लोकमान्य टिळक यांच्या कार्याचा प्रेरणास्रोत विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणारा हा उपक्रम वास्तवात एक विचारयात्रा ठरली.”

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *