माझा लेख ! माझे विचार!
![]()
🌹🌹माझा लेख 🌹🌹
विषय: प्रार्थना !!
नमस्कार , वाचक मित्रांनो आज माझा विषय आहे “प्रार्थना” !प्रार्थना म्हणजे मनापासुन केलेली देवाची आठवण.
तु बुद्धी दे !नवतेज दे!
सद्भावना विश्वास दे !
ही एक प्रार्थनाच आहे.आपण देवाला विनवणी करतो.
हे ईश्वरा सर्वांना
चांगली बुद्धी दे!
आरोग्य दे!
सर्वांना सुखात,
आनंदात, ऐश्वर्यात ठेव!
सर्वांचं भलं कर!
कल्याण कर,रक्षण कर!
आणि तुझे गोड नाम
मुखात अखंड राहु दे !
तर ही आहे वेश्विक प्रार्थना. यातुन आपणास एक सकारात्मक ऊर्जा मीळते.supreme soul power वाढते.प्रार्थनेत एक अलौकीक शक्ती असते.एक अपुर्व आनंद असतो.आणि जीतक्या आर्ततेने आपण हाक मारतो,तीतकाच देव उत्सुक असतो आपल्याला भेटायला व मदत करायला.आणि तितकाच लवकर देवाचा आशिर्वादही आपणास प्राप्त होतो.दु:ख आल्यावरच प्रार्थना करायची म्हणजे तहान लागल्यावर विहीर खोदण्यात सारखं आहे म्हणुन आधीच appointment घ्यायची म्हणजे पुढं देव उशीर करणार नाही भक्तासाठी.
सुखी माणसंही खुप देव देव करतात.आपली धन,संपत्ती,समय,संकल्प हे सर्व देवाला वाहतात.बघा कोणतंही सत्कार्य असो मग ते देवाचं वा कोणाला मदत करायची असेल.तर हीच ती संधी आहे सत्कर्म करुन पुण्य कमवण्याची.
पण आपल्याला जणीवही नसते की कोणाला मदत हवी आहे.आपण आपल्यातच गुरफटुन बसतो.
बघा देवानं स्रुष्टीची रचना कशी केली आहे तुम्ही धन कमवु शकता पण मरताना नेऊ शकत नाही.तुम्हाला माहीत आहे की अम्रुत आहे पण ते तुम्ही शोधु शकत नाही आणि तुमची वेळ संपली की तुम्ही काहीच करु शकत नाही.आपलं,आपलं म्हणतो पण ना मुलगी आपली ना मुलगा आपला ना पती किंवा पत्नी आपली.साथीला कोणीच नसतं जेव्हा जग सोडतो.म्हणुन जे कमवलंय ते बस्स आहे हाव कशासाठी.कधी तुम्ही देवाची आठवण करता का?कधी आत्मपरीक्षण करता का की मी जे करतोय ते देवाला मान्य आहे का?मी काय विचार करतोय कसं राहतोय,कुणाला सुख देतोय आणि कुणाला त्रास देतोय.बस्स आपली सारासार बुद्धी घाण ठेवतो अन् चालत राहतो.
देव दयाळु आहे,क्रुपाळु आहे पण तो एक निरीक्षकही आहे.आणि परीक्षकही आहे.असो तर प्रार्थना खरंच मंदीरात आरती गीता,मस्जीदीत कुराण,गुरुद्वार्यात गुरुवाणी अन् चर्च मध्ये बायबल हीच प्रार्थनेची साधने आहेत.पण आपण ते प्राप्ति करत नाही.बस्स चरैवती,चरैवती चालु आहे.
लता मंगेशकरचे गीत आहे.
इक तुही भरोसा,इक तु ही सहारा
तो सहारा जर मीळाला ना तर सर्वच शक्य आहे.पाषाणालाही अंकुर फुटतात,वाळवंटात फुले उमलतात अन् अंधारात प्रकाशकिरण पडतात.फक्त बोलवा बस्स !
आळवीता धाव घेई!असाच ईश्वर आहे.बस्स प्रत्येक संधीला त्याला बोलवा मग सोनं कस्स होत नाही ते बघा.
तु भजले प्रभु का नाम!
तेरे हो जाएंगे सब काम!
मनापासुन देवाला धन्यवाद द्या आणि संधीचं सोनं करा त्याने भरपुर संधी दिल्या आहेत,पर्यायही दिले आहेत मग का घाबरायचं.बीनधास्त राहायचं.नो टेंशन !!
धन्यवाद!!


आपली:रोहिणी गोरे
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

