महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे महापुरुषांना वंदन!….  अण्णाभाऊ साठे हे सत्याचा शोध घेणारे खरे सत्यशोधक – एच डी माळी
1 min read

महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे महापुरुषांना वंदन!…. अण्णाभाऊ साठे हे सत्याचा शोध घेणारे खरे सत्यशोधक – एच डी माळी

Loading

महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे महापुरुषांना वंदन!….

अण्णाभाऊ साठे हे सत्याचा शोध घेणारे खरे सत्यशोधक – एच डी माळी

धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर

धरणगांव – सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल येथे लोकशाहीर, साहित्यरत्न, सत्यशोधक अण्णाभाऊ साठे जयंती व लो.बाळ गंगाधर टिळक स्मृती दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पी डी पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका एम के कापडणे होते. विचार मंचावरील मान्यवरांच्या हस्ते लोकशाहीर सत्यशोधक अण्णाभाऊ साठे व लो.टिळक यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी निबंध स्पर्धेचे आयोजन केले होते यामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ असे बक्षीस विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक जे एस पवार व मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. शाळेतील जया सोनवणे, दिव्या भोई, वैभव माळी, सिद्धार्थ बैसाणे, यश जाधव यांनी महापुरुषांच्या जीवनावर प्रकाश टाकला.
प्रमुख वक्ते एच डी माळी यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जीवनपट उलगडून त्यांचा संघर्ष अण्णांनी या देशाला दिलेले अनमोल साहित्य यासंदर्भात विद्यार्थ्यांना विस्तृत माहिती सांगितली. कष्टकरी, शेतकरी, कामगारांच्या व्यथा आपल्या साहित्यात मांडणारे उत्कृष्ट कादंबरीकार, नाटककार, विचारवंत, लेखक, पत्रकार, लोकनाट्याचे जनक, आद्य शिवशाहीर, सत्यशोधक अण्णाभाऊ साठे हे साहित्य क्षेत्रातले अनमोल रत्न आहेत, सत्याचा शोध घेणारे खरे सत्यशोधक अण्णाभाऊ साठे आहेत असे प्रतिपादन माळी यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा एम के कापडणे मॅम यांनी महापुरुषांचे कार्य आपल्यासाठी प्रेरणादायी आहे म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी महापुरुषांच्या विचारांवर चालले पाहिजे हीच खरी महापुरुषांना आदरांजली ठरेल असे प्रतिपादन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन पी डी पाटील तर आभार एस एन कोळी यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *