न्यू इंग्लिश स्कूल, डांगरीत लोकमान्य टिळक आणि अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी
1 min read

न्यू इंग्लिश स्कूल, डांगरीत लोकमान्य टिळक आणि अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी

Loading

न्यू इंग्लिश स्कूल, डांगरीत लोकमान्य टिळक आणि अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी

अमळनेर प्रतिनिधी
ग्राम विकास शिक्षण मंडळ संचलित न्यू इंग्लिश स्कूल, प्रं.डांगरी.ता.अमळनेर येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जंयती उत्साहात साजरी करण्यात आली.सदर कार्यक्रम चे अध्यक्षस्थानी निलेश शर्मा सर तर प्रमुख वक्ते म्हणून विलास पाटील सर जि.प.शाळा.सात्री उपस्थित होते.कार्यक्रमा ची सुरुवात मान्यवरां च्या हस्ते प्रतिमा पूजन करून करण्यात आली.इयत्ता 5 वी ते10 वी च्या विद्यार्थ्यानी भाषण दिली.शाळेचे मुख्याध्यापक राकेश पवार सर यानी आपले विचार मांडतांना “जग बदल घालूनी घाव , सांगून गेले मला भिमराव “या गाण्याच्या ओळीने आपले मार्गदर्शन केले.
प्रमुख वक्ते विलास पाटील सर यांनी जीवनातील साध्या घटनांच्या माध्यमातून लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या बदल विचार मांडलेत. अध्यक्षीय भाषणात निलेश शर्मा सर यांनी लोकमान्य टिळक यांच्या चतुःसुत्री व अण्णाभाऊ साठे यांच्या संयुक्त महाराष्ट्र चळवळी बाबतीत सविस्तर माहिती देताना अण्णाभाऊ साठे यांच्या चळवळीतील घोषणा ,ये आज़ादी झूठी है,देश कि जनता भूखी है। असे अनेक उदाहरण देऊन माहिती दिली.कार्यक्रमा चे सूत्रसंचालन महेंद्र पाटील सरांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यास जेष्ठ शिक्षक पी.व्ही. साळुंखे, एस.बी. वाडीले,जे.एन.करंदीकर, श्रीमती.पी. के.सोनवणे,राजन शिंदे आदींनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *