दिव्यांगांच्या हक्कांसाठी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन सादर ,दिव्यांग बांधवांच्या समस्या सोडवण्यासाठी महाविकास आघाडी मैदानात
![]()
दिव्यांगांच्या हक्कांसाठी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन सादर
दिव्यांग बांधवांच्या समस्या सोडवण्यासाठी महाविकास आघाडी मैदानात
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
आज दिनांक 31 जुलै 2025 रोजी अमळनेर तालुका महाविकास आघाडीच्या वतीने दिव्यांग बांधवांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी शांततामय लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेस (शरद चंद्र पवार) पक्षाच्या दिव्यांग सेलचे जिल्हाध्यक्ष श्री. शांताराम सखाराम कोळी (मांडळ) यांच्या नेतृत्वाखाली पार पडले.
या आंदोलनानंतर माननीय उपविभागीय अधिकारी, अमळनेर यांना सविस्तर मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यामध्ये दिव्यांग बांधवांना वेळेवर पेन्शन, सरकारी कार्यालयांत सुलभ सेवा, आणि त्यांच्या हक्कांचे रक्षण या प्रमुख मागण्या होत्या.
कार्यक्रमावेळी माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील यांनी भावनिक भाषण करत जाहीर केले की, “यापुढे माझ्या दवाखान्यात सर्व दिव्यांग बांधवांना मोफत आरोग्य सेवा दिली जाईल.”
संदीप घोरपडे यांनी मागणी केली की, “राज्यपाल नियुक्त दिव्यांग प्रतिनिधी विधान परिषदेवर आमदार म्हणून नियुक्त केला जावा.”
शिवसेनेचे विजू मास्तर यांनी दिव्यांग बांधवांना वेळेवर पेन्शन न मिळणे आणि त्यांच्या कार्यालयीन त्रासांवर तीव्र नाराजी व्यक्त केली.
यावेळी महाविकास आघाडीचे प्रमुख नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते. त्यामध्ये –
प्रा. अशोक पवार, काँग्रेस नेते धनगर अण्णा पाटील, ग्रंथालय सेलचे प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील, तालुकाध्यक्ष डी. एम. पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बी. के. सूर्यवंशी, शहराध्यक्ष गजेंद्र साळुंखे, प्रशांत दादा निकम,प्रताप पाटील,ॲड. शकील काझी, किसान सेलचे मनोहर पाटील, युवक अध्यक्ष योगेश सिसोदे, महिला तालुकाध्यक्ष योजना पाटील, कविता पवार, मनीषा परब, चंद्रशेखर भावसार, बाळासाहेब पाटील, देवेंद्र देशमुख, मोहन भोई, गोकुळ कोळी, वासुदेव मामा, चिंधू वानखेडे इत्यादींचा समावेश होता.
या आंदोलनात तालुक्यातून आलेले अनेक दिव्यांग बंधू-भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डी. एम. पाटील यांनी तर आभार प्रदर्शन बी. के. सूर्यवंशी यांनी केले.

