मारवड महाविद्यालयात एक पेड माँ के नाम उपक्रमांतर्गत वृक्षारोपण*
1 min read

मारवड महाविद्यालयात एक पेड माँ के नाम उपक्रमांतर्गत वृक्षारोपण*

Loading

*मारवड महाविद्यालयात एक पेड माँ के नाम उपक्रमांतर्गत वृक्षारोपण*
कै. न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालय मारवड येथे राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत “एक पेड माँ के नाम” या उपक्रमा अंतर्गत वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी “झाडे लावा आणि झाडे जगवा” या विषयावर महाविद्यालयाचे उपप्राचार्य व भूगोल विभाग प्रमुख प्रा. डॉ. व्हि. डी.पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करून वृक्षारोपण केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत देसले यांनी एक पेड माँ के नाम उपक्रमाअंतर्गत झाडे लावली व ती जगवली तर पर्यावरणाचा समतोल टिकून राहिल असा आशावाद दर्शविला. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी एक पेड माँ के नाम या उपक्रमांतर्गत वृक्षारोपण केले.
कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.सतिश पारधी,महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. नंदा कंधारे ,विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डॉ. जितेंद्र माळी ,प्रा.विजय पाटील, प्रा. डॉ. देवदत्त पाटील, प्रा डॉ. दिलीप कदम, प्रा. डॉ. पवन पाटील, श्री.जगदिश साळुंखे,
श्रीमती मंजुषा गरूड, डॉ. सचिन पाटील,श्री.शाम पाटील, श्री.दिपक पाटील, श्री. सचिन साळुंखे, श्री. दिलीप चव्हाण तसेच प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *