चर्मकार समाजाने केला 172 गुणवंतांचा सन्मान , गुणवंतांनी विविध क्षेत्रात उच्च गुणवत्ता प्राप्त करून समाज विकासात सहभागी व्हावे-:वस्त्रोद्योगमंत्री नामदार संजयजी सावकारे यांचे आवाहन
1 min read

चर्मकार समाजाने केला 172 गुणवंतांचा सन्मान , गुणवंतांनी विविध क्षेत्रात उच्च गुणवत्ता प्राप्त करून समाज विकासात सहभागी व्हावे-:वस्त्रोद्योगमंत्री नामदार संजयजी सावकारे यांचे आवाहन

Loading

चर्मकार समाजाने केला 172 गुणवंतांचा सन्मान

गुणवंतांनी विविध क्षेत्रात उच्च गुणवत्ता प्राप्त करून समाज विकासात सहभागी व्हावे-:वस्त्रोद्योगमंत्री नामदार संजयजी सावकारे यांचे आवाहन

 

जळगांव प्रतिनिधी

जळगाव येथे चर्मकार विकास संघ व गुरु रविदास क्लब, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक 27 जुलै रोजी सकाळी 10 वाजता सरदार वल्लभभाई पटेल सभागृह,जळगाव येथेआयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला.या प्रसंगी व्यासपीठावर महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री तथा वस्त्रोद्योग मंत्री नामदार श्री.संजयजी सावकारे,जळगाव लोकसभा खासदार श्रीमती स्मिताताई वाघ,आमदार श्री राजुमामा भोळे,चर्मकार विकास संघाचे प्रदेशाध्यक्ष श्री संजयजी खामकर,श्री.लक्ष्मणराव घुमरे,प्रा.दिनेश देवरे,माजी महापौर तथा जिल्हाशिवसेना प्रमुख श्री विष्णूभाऊ भंगाळे,कार्यकारी अभियंता श्री.महेश तांबे,उपकार्यकारी अभियंता श्री योगेश अहिरे,सेवानिवृत्त मुख्य अभियंता श्री.राजेंद्र बावस्कर,गुरु रविदास क्लबचे अध्यक्ष डॉ.सुनील सूर्यवंशी,गुरु रविदास संस्थेचे अध्यक्ष श्री खंडू पवार ,सरपंच श्री.राजेश वाडेकर सर,श्री.आनंद सपकाळे,चर्मकार विकास संघाचे राज्य कार्यकारिणी सदस्य श्री विश्वनाथ सावकारे,श्री.संजय वानखेडे सर,श्री.संजय भटकर सर, जिल्हाध्यक्ष ॲड.श्री.अर्जुन भारुळे,सचिव प्रा.श्री.धनराज भारुळे,कार्याध्यक्ष श्री.राजेश वाडेकर सर,विभागीय अध्यक्ष श्री.मनोजभाऊ सोनवणे,श्री.प्रकाश रोजतकर श्री.कमलाकर ठोसर,श्री.विजय पवार श्री.प्रदीप डोळे ,श्री.चेतन तायडे,प्राचार्य.शिंदे,आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या सुरवातीस प्रास्ताविक श्री.राजेश वाडेकर व डॉ.सुनील सूर्यवंशी यांनी करून चर्मकार विकास संघ व गुरु रविदास क्लब यांनी राबविलेल्या विविध समाजपयोगी उपक्रमांची माहिती दिली. या प्रसंगी प्रमुख अतिथी यांच्या हस्ते गुरु रविदास,महात्मा ज्योतिबा फुले,राजश्री शाहू महाराज,शिवाजी महाराज,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन तसेच दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.या वेळेस कु.अनुष्का व कु.दुर्वा भारुळे यांनी स्वागत गीत सादर केले.या वेळेस इयत्ता 10वी,12वी,विविध शिक्षण शाखेतील पदवी,पदविका,पदव्युत्तर पदवी,पी.एच.डी, शिष्यवृत्ती,नवोदय स्पर्धा परीक्षा,आय.आय. टी.नीट आदी परीक्षेतील 172 गुणवंत व त्यांच्या पालकांना मान्यवरांच्या हस्ते रोख बक्षिस, स्मृती चिन्ह,प्रमाणपत्र,प्रेरणादायी पुस्तक (यशाचा राजमार्ग),गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.या वेळेस प्रमुख अतिथी वस्त्रोद्योग मंत्री नामदार श्री.संजय जी सावकारे,खासदार श्रीमती स्मिताताई वाघ,आमदार श्री.राजुमामा भोळे,प्रदेशाध्यक्ष श्री.संजय खामकर साहेब,श्री.लक्ष्मणराव घुमरे साहेब यांनी गुणवंत विद्यार्थी व त्यांच्या पालकांचे अभिनंदन करून गुणवंतांनी विविध क्षेत्रात उच्च गुणवत्ता संपादन करून स्वतःचा व समाजाचा विकास करण्याचे व संघटित होण्याचे आवाहन केले.या प्रसंगी इ.10 वी,12 वी मध्ये समाजातून प्रथम,द्वितीय,तृतीय क्रमांक प्राप्त केलेल्या गुणवंतांना 1500,1000,700 व इतर गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांना रोख स्वरूपात पारितोषिके देण्यात आली.या कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा.श्री.धनराज भारुळे,श्री.संजय भटकर,श्री.संजय वानखेडे,प्रा.सौ.उज्वला वाडेकर,प्रा.सौ.स्मिता जयकर यांनी तर आभार प्रदर्शन ॲड.श्री.अर्जुन भारुळे यांनी केले .हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा श्री.गणेश सूर्यवंशी,श्री.गजानन दांडगे,
श्री.यशवंतराव ठोसरे,श्री.प्रकाश रोजतकर,श्री.संजय वानखेडे,श्री.विश्वनाथ सावकारे,श्री.कडू भोळे ,प्रा.श्री. विठ्ठलराव सावकारे,श्री.काशीनाथ इंगळे,श्री.बाळकृष्ण खिरोळे,श्री.निवृत्ती सूर्यवंशी,श्री.श्री.संजय बाविस्कर,श्री.पंकज तायडे,श्री.कमलाकर ठोसर,श्री.शिवदास कळसकर,श्री.प्रशांत सोनवणे,प्रा.श्री.रवींद्र नेटके,प्रा.अशोक चित्ते,श्री.पंकज तायडे, श्री ज्ञानेश्वर शेकोकारे,श्री.सीताराम राखुंडे,श्री.प्रवीण बाविस्कर,रतीराम सावकारे, श्री. सुधाकर मोरे,श्री.कैलास वाघ,चावदस सपकाळे,प्रा.संदीप शेकोकार,श्री.संदीप ठोसर,श्री.यशवंत वानखेडे,श्री.पंकज भारुळे ,श्री.अरुण नेटके,श्री.संजय चिमणकर तसेच चर्मकार विकास संघ व गुरु रविदास क्लबच्या पदाधिकारी व सदस्यांनी व चर्मकार बांधवांनी सहकार्य केले.या वेळेस चर्मकार विकास संघाच्या नवीन पदाधिकारी यांची नियुक्ती व सत्कार करण्यात आला .या वेळेस मोठ्या संख्येने चर्मकार समाज बांधव उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *