अमळनेरमध्ये ‘एस एस मोबाईल’चे भव्य पदार्पण – भद्रा प्रतीक मॉलमध्ये 19 जुलैला शुभारंभ सोहळा!
![]()
अमळनेरमध्ये ‘एस एस मोबाईल’चे भव्य पदार्पण – भद्रा प्रतीक मॉलमध्ये 19 जुलैला शुभारंभ सोहळा!
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
अमळनेर शहरातील नव्हे तर संपूर्ण तालुक्यात ग्राहकप्रिय ठरलेले भद्रा प्रतीक मॉल आता आणखी एका महत्त्वपूर्ण पावलाकडे वाटचाल करत आहे. ग्राहकांच्या प्रचंड मागणीनुसार, भारतातील आघाडीची व तिसऱ्या क्रमांकाची मोबाईल रिटेल कंपनी असलेल्या एस एस मोबाईलची नवी शाखा अमळनेरमध्ये सुरू होत आहे.
या शाखेचा भव्य शुभारंभ सोहळा येत्या शनिवारी, 19 जुलै रोजी सकाळी 11 वाजता, श्री भद्रा प्रतीक मॉल, गलवाडे रोड, अमळनेर येथे संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान लोकप्रिय खासदार सौ. स्मिताताई वाघ भूषवणार असून, उद्घाटन माजी मंत्री व विद्यमान आमदार श्री. अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते होणार आहे.
कार्यक्रमास मा. आमदार डॉ. बी.एस. पाटील, मा. आमदार साहेबराव पाटील, मा.आमदार शिरीष चौधरी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक पाटील, प्रांताधिकारी नितीनकुमार मुंडावरे, उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, पोलीस निरीःक्षक दत्तात्रय निकम, माजी नगराध्यक्ष सुभाष चौधरी, तसेच मंगळग्रह संस्थानचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले हे मान्यवर उपस्थित राहून आपली उपस्थिती कार्यक्रमास लाभवणार आहेत.
श्री भद्राहनुमान महाराजांच्या कृपेने, आई-वडिलांच्या आशीर्वादाने व ग्राहकांच्या अमूल्य प्रेमाने साकारत असलेल्या या मोबाईल शाखेमुळे अमळनेरकरांना आता एकाच ठिकाणी नवनवीन ब्रँड्स, उत्कृष्ट सेवा व आधुनिक तंत्रज्ञान अनुभवण्याची संधी मिळणार आहे.
प्रताप छबुलालशेठ साळी, दीपक छबुलालशेठ साळी, संदीप छबुलालशेठ साळी, प्रसन्नजीत प्रताप साळी व अक्षय मोंन्टी प्रताप साळी यांनी सर्व अमळनेरवासीय, ग्राहक, हितचिंतक, मित्रपरिवार यांना या सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.


