सार्वजनिक विद्यालयात जळगाव पीपल्स बँकेतर्फे शैक्षणिक साहित्य वाटप
1 min read

सार्वजनिक विद्यालयात जळगाव पीपल्स बँकेतर्फे शैक्षणिक साहित्य वाटप

Loading

सार्वजनिक विद्यालयात जळगाव पीपल्स बँकेतर्फे शैक्षणिक साहित्य वाटप

असोदा – सार्वजनिक विद्यालयात जळगाव पीपल्स बँकेतर्फे शाळेतील गुणवंत हुशार होतकरू व गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. याप्रसंगी मंचावर कार्यक्रमाध्यक्ष अनिल महाजन, पीपल्स बँकेचे चेअरमन अनिकेत पाटील, व्यवस्थापन मंडळ सदस्य भूषण चौधरी, शाखा सल्लागार गुणवंत पाटील, जनसंपर्क अधिकारी गोविंद खांदे, बचत गट विभागप्रमुख शुभश्री दप्तरी, शाखा अधिकारी मुकेश बडगुजर, बँकेचे एमडी व सीईओ रोहित भुजबळ,संस्थेचे सचिव विलासराव चौधरी, सदस्य उद्धवराव पाटील, दिलीप अत्तरदे, मुख्याध्यापक डॉ.मिलिंद बागुल, पर्यवेक्षक एल. जे. पाटील उपस्थित होते. मोहिनी पाटील व स्वाती कुंभार या विद्यार्थिनींनि मनोगतातून पीपल्स बँकेचे ऋणी आहोत असे मत व्यक्त केले. चेअरमन अनिकेत पाटील यांनी विद्यार्थ्यांना फक्त पाठांतरावर भर न देता मिळालेल्या ज्ञानाचा विचारपूर्वक उपयोग करावा असा संदेश त्यांच्या मनोगतातून दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक डॉ.मिलिंद बागुल, सूत्रसंचालन मीनाक्षी कोल्हे तर आभार भारती पाटील यांनी मानले. कार्यक्रमात सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती लाभली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *