पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या नेतृत्वाखालील अमळनेर पोलिसांचा दणदणीत छापा – जळोद गावाजवळ १५ किलो गांजा व दोन तस्कर जेरबंद!
![]()
पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या नेतृत्वाखालील अमळनेर पोलिसांचा दणदणीत छापा – जळोद गावाजवळ १५ किलो गांजा व दोन तस्कर जेरबंद!
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
दि. १५/०७/२०२५ रोजी अमळनेर शहरात पोकों ५३७ अमोल पाटील हे गस्त करीत असतांना त्यांना गुप्त बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, दोन इसम हे मोटर सायकल क्रं. एम. एच. १९-सी. टी. ४८४५ हिच्यावर बेकायदेशीर गांजा कब्जात बाळगुन विक्री करण्यासाठी जळोद गावाकडुन अमळनेर शहरात येणार आहे. बाबत मा. पोलीस निरीक्षक सो. श्री दत्तात्रय निकम यांना माहीती कळविल्यावरुन छापा टाकणेकामी मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सो. यांची परवानगी घेवुन जळोद ता. अमळनेर या गावात आम्ही तसेच सोबत पोलीस स्टाफ, पंच, फोटोग्राफर, वजन मापाडी व लेखनीक अमलदार अश्यांसह रवाना होवुन जळोद ता. अमळनेर या शिवारातील रोड लगत एका शेताजवळ थांबलो. त्यानंतर २२.१० वाजेच्या सुमारास जळोद गावाकडुन एक काळ्या रंगाची बजाज प्लॅटीना मोटर सायकलवर दोन इसम हे डबलशीट येत असल्याचे लक्षात आल्याने पोकों अमोल पाटील व पोकों जितेंद्र निकुंभे यांनी सदर मोटर सायकल चालकास थांबण्याचा इशारा केल्याने सदर गाडीवरील चालकाने त्यांच्या ताब्यातील मोटर सायकल थांबविली. त्यानंतर आम्ही तसेच आमच्या सोबत असलेला पोलीस स्टाफ अश्यांनी त्यांच्या ताब्यातील एक पांढऱ्या रंगाची गोणीसह त्या दोघा इसमांना ताब्यात घेतले. मा. पोलीस निरीक्षक सो. श्री दत्तात्रय निकम यांनी स्वत चे पोलीस ओळखपत्र दाखवत श्री रुपेशकुमार सुराणा तहसिलदार अमळनेर यांनी सोबतच्या पोलीस स्टाफ व पंच तसेच इतरांची स्पष्ट ओळख करुन दिली व त्यांना पंचांसमक्ष त्यांचे नाव पत्ता विचारले असता मोटर सायकल चालकाने त्याचे नाव महेश कैलास पाटील वय ३१ वर्षे धंदा मजुरी रा. मेन रोड, जडे गल्ली, भडगाव ता. भडगाव जि. जळगाव व त्याचे सोबत असलेला इसमाचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव नितीन शरद गौंड (मसराम) वय १९ वर्षे धंदा मजुर रा. गाँडबस्ती देशमुखनगर, पाचोरा ता. पाचोरा जि. जळगाव असे असल्याचे सांगितले. दोघा इसमांचे ताब्यात मिळुन आलेले गांजा व मोटर सायकल चे वर्णन खालील प्रमाणे.
१) ३,००,०००/- रु. किं. एका पांढऱ्या रंगाच्या गोणीमध्ये १५ किलो ४० ग्रॅम वजनाचा गांजा त्यातुन १०० ग्रॅम वजनाचे प्रत्येकी ०३ पाकीटे सि. ए. सॅम्पल काढण्यात आले आहे उर्वरीत गांजाचे एकुण वजन १४ किलो ७४० ग्रॅम शिल्लक आहे.
२) ४०,०००/- रु. किं. ची बजाज प्लॅटीना काळ्या रंगाची मोटर सायकल क्र. एम. एच. १९ सी. टी. ४८४५ असा असलेली जु. वा. की. अ.
३,४०,०००/- एकुण (१५ किलो ४० ग्रॅम गांजा सॅम्पलसह)
वरील प्रमाणे मुद्देमाल जप्त करुन त्यांचे विरुध्द अमळनेर पोलीस स्टेशन येथे गु. र. नं. २८६/२०२५ गुंगीकारक औषधीद्रव्य आणि मनोव्यापारावर परीणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ कलम ८, २०, २२, ३ (५) अन्वये पोकों ५३७ अमोल पाटील यांचे फिर्यादीवरुन गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदर ची कारवाई ही मा. पोलीस अधिक्षक सो. श्री महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधिक्षक, चाळीसगाव परीमंडळ श्रीमती कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी, अमळनेर उपविभाग श्री विनायक कोते यांचे मार्गदर्शनाखाली मा. पोलीस निरीक्षक सो. श्री दत्तात्रय निकम, सपोनि रविंद्र पिंगळे, सपोनि सुनिल लोखंडे, पोहेकॉ संतोष नांगरे, पोकों प्रशांत पाटील, पोकों गणेश पाटील, पोकॉ अमोल पाटील, पोकों जितेंद्र निकुंभे, पोकों उज्वलकुमार म्हस्के, पोकों हर्षल पाटील, पोकों योगेश बागुल, पोकों समाधान सोनवणे, पोकों सुनिल पाटील व होम. पुनम हटकर यांनी केली आहे.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि श्री सुनिल लोखंडे हे करीत आहेत.

