“गुरु”पणाचे खरे उदाहरण – गणेश काकडे यांनी भाग्यश्रीच्या शिक्षणाची घेतली जबाबदारी
1 min read

“गुरु”पणाचे खरे उदाहरण – गणेश काकडे यांनी भाग्यश्रीच्या शिक्षणाची घेतली जबाबदारी

Loading

“गुरु”पणाचे खरे उदाहरण – गणेश काकडे यांनी भाग्यश्रीच्या शिक्षणाची घेतली जबाबदारी..

 

जळगांव प्रतिनिधी

बामनोद: पी एस एम एस स्कूल व ज्युनिअर कॉलेज बामनोद येथे गुरुपौर्णिमेनिमित्त निराधार मुलगी भाग्यश्री योगेश जयकारे या मुलीला शाळेतील कर्मचारी तसेच प्राध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी (प्रोटान)संघटनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष व चर्मकार विकास संघाचे विभागीय उपाध्यक्ष तथा लेखक सामाजिक कार्यामध्ये तत्परतेने काम करणारे व शिक्षण क्षेत्रात अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाणारे निर्भीड व्यक्तिमत्व गणेश काकडे यांनी इयत्ता पाचवीच्या या मुलीचे पाचवी ते सातवी पर्यंतच्या शिक्षणाच्या खर्चाची जबाबदारी स्वतःकडे घेतली आहे व या मुलीचे पालकत्व स्वीकारले आहे ही गुरुपौर्णिमेनिमित्त गुरु कडून शिष्याला दिली गेलेली एक भेट आहे.
भाग्यश्री योगेश जयकारे इयत्ता पाचवी या निराधार मुलीला प्रागतिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर नरेंद्र कोल्हे व मुख्याध्यापक आर एस अडकमोल व प्रोटान संघटनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष गणेश काकडे यांच्या हस्ते शाळेचा ड्रेस व शालेय साहित्य देण्यात आले. शाळेतील नव्हे तर पंचकोशीमध्ये शिक्षण घेत असलेल्या निराधार मुलं व मुलींना मदत करण्यासाठी गणेश काकडे यांनी व त्यांच्या सोबत सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या सहकाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *