महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटना* *दि. 09 जुलै 2025 रोजी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा एक दिवशीय लाक्षणिक संप यशस्वी..*
![]()
*महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटना*
*दि. 09 जुलै 2025 रोजी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा एक दिवशीय लाक्षणिक संप यशस्वी..*
जळगांव प्रतिनिधी
देशातील अकरा मध्यवर्ती संघटनांनी केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणांच्या विरोधात दि. 09 जुलै 2025 रोजी देशव्यापी लाक्षणिक संपाची हाक दिली होती
त्या अनुषंगाने सदर संपाला पाठिंबा देत राज्यसह जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी कार्याध्यक्ष रामकृष्ण बी.पाटील यांच्या नेतृत्वाखाली 100% संपात भागीदारी करून तो यशस्वी केला.खालील प्रलंबित मागण्यांचे निवेदन श्री. हेमंतराव भदाणे(जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला व बालविकास जिल्हा परिषद) यांना दिले.
*मागण्या*
*1)* मा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अंगणवाडी सेविका मदतनीसांना ग्रॅच्युटी लागू करावी तसेच गुजरात उच्च न्यायालयाच्या निवाड्यानुसार सेविकांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन सेविकांना तृतीय श्रेणी आणि मदतनीसांना चतुर्थ श्रेणी लागू करावी.
*2)* अंगणवाडी कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी आणि दरमहा सेवानिवृत्ती वेतन लागू करावे.
*3)* THR वाटपासाठी FRS आणि आहार वाटपासाठीची आधार जोडणी रद्द करावी.
*4)* FRS मधील तांत्रिक अडचणी( फोटो कॅपचर) दूर करून सेविकांना दैनंदिन होणारा त्रास थांबवावा.
*5)* अंगणवाडी कर्मचाऱ्यांना 15-15 दिवसांऐवजी एक महिना उन्हाळी सुट्टी देण्यात यावी.
*6)* अंगणवाडी केंद्राची वेळ सकाळी 09.30 ते दुपारी 04.00 ऐवजी सकाळी 07.30 ते दुपारी 02.00 वाजेपर्यंत करावी तसेच अंगणवाडी केंद्राची वेळ पूर्वीप्रमाणेच करावी.
*7)* मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे काम केलेल्या सेविका मदतनीसांना थकीत मेहताना देण्यात यावा.
*8)* सेविका मदतनीसांना त्यांच्या सेवा काळात महत्वाच्या कारणासाठी मागणीनुसार बदली करण्यात यावी.
*9)* सेविकांच्या रिक्त पदांवर पात्र आणि अनुभवी मदतनीसांना थेट नियुक्ती देण्यात यावी.
*10)* मुख्यसेविकांच्या पदावर सेविकांना पदोन्नती देण्यासाठीचे निकष(10 वी उत्तीर्ण आणि वय 55 वर्षे) पूर्वीप्रमाणेच ठेवावे.
सदर लक्षणिक संपात सहभागी होऊन अंगणवाडी केंद्र आणि पोषण ट्रॅकरसह सर्व दैनंदिन ऑनलाईन कामकाज बंद ठेवले.संप यशस्वी करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व तालुका आणि बिट प्रमुखांनी प्रयत्न केले.

