आमदार तथा माजीमंत्री अनिल दादांच्या कार्यगौरवाचा उत्सव समाजसेवेच्या उपक्रमांनी होणार साजरा! कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक पाटील
![]()
आमदार तथा माजीमंत्री अनिल दादांच्या कार्यगौरवाचा उत्सव समाजसेवेच्या उपक्रमांनी होणार साजरा!
कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक पाटील
अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन)
निम्न तापी प्रकल्पाला ऐतिहासिक गती देणारे, कार्यसमर्थ नेतृत्वाची ओळख असलेले, राज्याचे माजी मंत्री आणि अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय नेते अनिल दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांनी समाजहित साधले गेले.
या निमित्ताने, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने शेतकरी राजासाठी बैल साज वाटप, मापाडींसाठी वैयक्तिक लॉकर व सुविधांचा शुभारंभ, तसेच शैक्षणिक, सामाजिक चळवळींना गती देणारे अनेक उपक्रम राबवले गेले.
या उपक्रमांचे आयोजन बापूसो अशोक आधार पाटील (सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती व अध्यक्ष, श्री राज शिक्षण प्रसारक मंडळ), दादासो सुरेश किरण पाटील (उपसभापती), तसेच सर्व संचालक मंडळ, सचिव, कर्मचारीवृंद, व्यापारी, हमाल-मापाडी व गुमास्ता बंधूंनी संयुक्तपणे केले.
या उपक्रमांमधून अनिल दादांचा लोकाभिमुख दृष्टिकोन, शेतकरीप्रेम आणि शिक्षणविषयीची बांधिलकी पुन्हा अधोरेखित झाली. त्यांच्या नेतृत्वाखाली अमळनेर परिसरात विकासाच्या वाटचालीला गती मिळाली असून, त्यांचे कार्य हे नव्या पिढीला प्रेरणादायी ठरत आहे.
जाहिरात..


