सार्वजनिक विद्यालयात गरीब,गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना वह्या वाटप
1 min read

सार्वजनिक विद्यालयात गरीब,गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना वह्या वाटप

Loading

सार्वजनिक विद्यालयात गरीब,गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना वह्या वाटप

असोदा – असोदा येथील समर्थ ॲक्वाचे संचालक जनार्दन तोतराम कोल्हे यांच्याकडून स्वातंत्र्यसैनिक तोताराम चावदस कोल्हे यांच्या स्मरणार्थ गरीब,गरजू व होतकरू 150 विद्यार्थ्यांना परिस्थिती अभावी मागे न राहता प्रवाहामध्ये येण्याकरिता व वह्यांच्या रूपाने मदत केली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष अनिल महाजन होते.मंचावर शाळेचे मुख्याध्यापक डॉ.मिलिंद बागुल, पर्यवेक्षक एल .जे.पाटील उपस्थित होते.जनार्दन कोल्हे यांनी मनोगत व्यक्त करताना म्हटले की, मी या शाळेचा माजी विद्यार्थी असल्यामुळे शाळेप्रती असलेल्या आपुलकीच्या व ऋण व्यक्त करण्याच्या भावनेतून या उपक्रमाचे आयोजन करायचे ठरवले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गोपाळ महाजन यांनी तर सूत्रसंचालन शुभांगिनी महाजन व आभार अनिता पाटील यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *