विभागीय आयुक्त मा. प्रवीण गेडाम साहेब यांना कास्ट्राईब कर्मचारी संघटनेतर्फे निवेदन सादर*
![]()
*विभागीय आयुक्त मा. प्रवीण गेडाम साहेब यांना कास्ट्राईब कर्मचारी संघटनेतर्फे निवेदन सादर*
कास्ट्राईब कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त मा. प्रवीण गेडाम साहेब यांची भेट घेऊन नाशिक विभागातील कर्मचाऱ्यांच्या असणाऱ्या विविध अडचणी समस्या संदर्भात चर्चा करण्यात येऊन त्यांना महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष अनिल सुरडकर यांच्या नेतृत्वाखाली उपाध्यक्ष सुनील भाऊ सोनवणे, विभागीय अध्यक्ष रावसाहेब जगताप, महासंघाचे जिल्हाध्यक्ष डॉ. मिलिंद बागुल, सल्लागार विजयकुमार मौर्य यांनी निवेदन दिले, निवेदनात मागासवर्गीय कर्मचारी यांच्या सरळ सेवेतील रिक्त पदांचा अनुशेष बिंदू नामावलीप्रमाणे भरण्यात यावा, दिनांक ३१ डिसेंबर २०१७ ते ७ मे २०२१ या कालावधीमध्ये मागासवर्गीयांच्या पदोन्नती बाबत केलेल्या कार्यवाहीचा अहवाल मिळावा, मागासवर्गीय कक्षा द्वारे मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचा अनुशेष भरून काढणे बाबत बिंदू नामावलीची पडताळणी केली जाते किंवा कसे पडताळणी करून देखील अनुशेष न भरणाऱ्या अधिकारी, शैक्षणिक संस्था यांच्यावर कारवाई करण्यात यावी, मागासवर्गीय कर्मचारी यांच्या पदोन्नती मधील अनुशेष भरणे बाबत, लाड पागे समितीच्या शिफारशीनुसार सफाई कामगार सेवानिवृत्त, मयत झाल्यानंतर त्याच्या वारसास त्वरित नोकरीचा लाभ देणे बाबत सर्व विभागांना आपल्या स्तरावरून सूचना देण्यात याव्यात, आपल्या विभागांतर्गत जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी कार्यालयात मागासवर्गीय कक्ष स्थापन करण्यात यावा, जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात संघटनेच्या कार्यालयाकरिता एक कक्ष देण्यात यावा, शासन निर्णय ३/३/२०१८ नुसार दर तीन महिन्यातून कास्ट्राईब संघटनेची स्वतंत्र बैठक तथा तक्रार निवारण सभा आयोजित करण्यात यावी, पाच वर्ष एकाच विभागात पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांची विभागांतर्गत बदल्या करण्यात याव्यात, आरोग्य विभागातील कर्मचारी यांचे वेतन दिनांक १ एप्रिल २०२५ पासून बायोमेट्रिक व फेस रिडिंग नुसार अदा करण्यात येत आहे तथापि सदर कर्मचाऱ्यांना पूर्वीप्रमाणेच वेतन अदा करणे बाबत कार्यवाही व्हावी, एकाच कार्यसनावर सलग तीन वर्ष कामकाज करीत असलेल्या कर्मचाऱ्यांचे कार्यसनात बदल करण्यात यावेत अशा स्वरूपाच्या मागण्या निवेदनात करण्यात आल्या असून याप्रसंगी मा. प्रवीण गेडाम साहेब यांनी सकारात्मक चर्चा करून विभागांतर्गत कर्मचाऱ्यांच्या असणाऱ्या अडीअडचणी तसेच मागण्यासंदर्भात योग्य प्रकारे न्याय देण्याचे आश्वासन दिले.

