राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सोशल मीडिया विभागाच्या जळगाव लोकसभा “जिल्हा कार्याध्यक्ष” पदी ज्ञानदीप सांगोरे तर “जिल्हा उपाध्यक्ष” पदी करण साळुंखे यांची निवड*
![]()
*राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सोशल मीडिया विभागाच्या जळगाव लोकसभा “जिल्हा कार्याध्यक्ष” पदी ज्ञानदीप सांगोरे तर “जिल्हा उपाध्यक्ष” पदी करण साळुंखे यांची निवड*
अमळनेर प्रतिनिधी
गुरुवार दिनांक 3/07/2025 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे आपल्या विविध सेलच्या प्रदेशाध्यक्षांसह जळगाव जिल्हाच्या दौऱ्यावर होते,
या दौरा दरम्यान प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया विभागाच्या “जिल्हा कार्याध्यक्ष” पदी ज्ञानदीप सांगोरे तर
“जिल्हा उपाध्यक्ष” पदी करण साळुंखे यांची निवड करण्यात आली
माजी मंत्री अनिल पाटील,युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जळगाव जिल्हाध्यक्ष संजय पवार,सोशल मीडिया विभागाचे जिल्हाध्यक्ष सनी गायकवाड यांच्या उपस्थितीत ही निवड करण्यात आली..
पक्षाच्या ध्येय-धोरणांचा प्रसार व्यापक करण्यासाठी आणि सोशल मीडियाच्या माध्यमांतून पक्षसंघटनेस अधिक बळकटी देण्यासाठी व आगामी काळात होऊ घातलेला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी करिता सोशल मीडिया विभाग प्रभावी भूमिका बजावेल असा विश्वास यावेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला

