सेवाव्रती दीपस्तंभाला मानाचा मुजरा! – प्रकाश मन्साराम पाटील यांचा सेवानिवृत्ती समारंभ उत्साहात संपन्न
1 min read

सेवाव्रती दीपस्तंभाला मानाचा मुजरा! – प्रकाश मन्साराम पाटील यांचा सेवानिवृत्ती समारंभ उत्साहात संपन्न

Loading

सेवाव्रती दीपस्तंभाला मानाचा मुजरा! – प्रकाश मन्साराम पाटील यांचा सेवानिवृत्ती समारंभ उत्साहात संपन्न

 

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
२ जुलै २०२५ बुधवार रोजी भालेरावनगर आणि पाटीलगढी यांच्या संयुक्त विद्यमाने निरोपार्थी भगिनी यांना त्यांच्या दीर्घकालीन आणि उत्कृष्ट सेवेबद्दल अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाचा अध्यक्षस्थानी श्री प्रभाकर पाटील, पेन्शनर मुख्याध्यापक, होते.
कार्यक्रमाची सुरुवात कॉलनीतील ज्येष्ठ आणि अनुभवसंपन्न दादासाहेब श्री ए.डी. पाटील यांच्या प्रेरणादायी आयुष्यकथनेने झाली तर सूत्रसंचालन बापूसाहेब विजय पाटील रत्नापिंप्रीकर यांनी त्यांच्या शेरोशायरीतून दिवसभरातील दिनचर्या सांगितली. एडवोकेट श्री दिनेश पाटील यांनी संयम आणि सेवेचा उल्लेख केला.
आबासाहेब श्री गोकुळ पाटील, मा. केंद्रप्रमुख, यांनी निरोपार्थी विषयक माहिती दिली तर अण्णासाहेब श्री प्रकाश मन्साराम पाटील यांनी त्यांच्या भावभावनांचा उल्लेख केला.
निरोपार्थी भगिनींनी जळगाव जिल्हा गटसचिव म्हणून ३४ वर्षांपर्यंत सहकार क्षेत्रात अतुलनीय सेवेचा ठसा उमठविला आहे. त्यांनी सर्वांगीण समर्पण, निष्ठा, संयम आणि पारदर्शकतेने त्यांच्या पदाची प्रतिष्ठा वाढवली. कमी पगारावर देखील त्यांनी कुटुंब सांभाळून आणि अनेक अडचणींवर मात करून उत्तम सेवा बजावली.
कुटुंबासाठी त्यांच्या शिकवणीची आणि संयमी वागणुकीची उदाहरणेही काही वेगळेच आहे. भगिनींच्या आजार असलेल्या धर्मपत्नीची त्यांनी अतिशय मनापासून काळजी घेतली आहे. बहिणीची मदत आणि कुटुंबियांचे सहकार्य त्यांच्या सेवेचा पाया होता.
त्यांच्या सेवेतून त्यांनी “सभासदांची खुशी म्हणजे माझा आनंद” ही भूमिका आत्मसात करून, सहकार क्षेत्रात एक दीपस्तंभ म्हणून काम केले. त्यांच्या सेवेमुळे कॉलनीतील सर्व सदस्यांमध्ये सकारात्मकता आणि बंधुत्व यांचे वाढीस लागले.
कार्यक्रमात कॉलनीतील अनेक मान्यवर उपस्थित होते ज्यांनी निरोपार्थी भगिनींना शुभेच्छा दिल्या आणि त्यांचा सत्कार केला.
निरोपार्थी भगिनी म्हणाल्या की, “माझ्यावर सर्व बंधूंनी आणि भगिनींनी मोठ्या प्रेमाने सन्मान केला, ज्याबद्दल मी मनापासून आभारी आहे.”
या कार्यक्रमामुळे निरोपार्थी भगिनींच्या समर्पित सेवेचा गौरव झाला आणि त्यांच्या पुढील जीवनासाठी सर्वांच्या शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कॉलनीतील सारे सदस्य उपस्थित होते. त्यात श्री रामचंद्र उपासनी, श्रीराम पाटील, अहिरराव दादा,व्ही एक पाटील, विलास पाटील, योगेश खैरनार, प्रविण पाटील, दयाराम पाटील, डॉ महेश पाटील,एम ए पाटील, अनिल दुसाने, राजेंद्र पाटील, गुलाबराव बोरसे, महेंद्र काटे,पराग पाटील, महेश पाटील, स्वप्निल पाटील,भटू पाटील, विजय पाटील, दादाभाऊ पाटील, संजीव पाटील, आशिष निकम, किशोर पाटील, ठाकरे भाऊसाहेब, युवराज पाटील, इ.उपस्थीत होते.
निरोपार्थींचे मनोगतात म्हणाले माझ्यावर भालेरावनगर व पाटीलगढीतील सर्व सज्जन बंधू भगिनी मोठ्या प्रमाणावर येऊन माझ्या सन्मान केला. व मी केलेले कार्याचा गौरव केला. मी सर्वांचा ऋणी राहील आभार मानतो.व आभार श्री प्रकाश मन्साराम पाटील यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *