संधी ओळखा, योग्य दिशा निवडा, यश तुमचेच आहे! सेमिनार मध्ये मार्गदर्शक मान्यवरांचा सूर , “‘योग्य मार्गदर्शन – उज्ज्वल भवितव्य’ : ६०० हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग; गुणवंतांचा गौरव आणि करिअर मार्गदर्शनाचा प्रेरणादायी सेमिनार” , “DYPDPU व IKD मॅथ्स अकॅडमीच्या संयुक्त उपक्रम
1 min read

संधी ओळखा, योग्य दिशा निवडा, यश तुमचेच आहे! सेमिनार मध्ये मार्गदर्शक मान्यवरांचा सूर , “‘योग्य मार्गदर्शन – उज्ज्वल भवितव्य’ : ६०० हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग; गुणवंतांचा गौरव आणि करिअर मार्गदर्शनाचा प्रेरणादायी सेमिनार” , “DYPDPU व IKD मॅथ्स अकॅडमीच्या संयुक्त उपक्रम

Loading

संधी ओळखा, योग्य दिशा निवडा, यश तुमचेच आहे!
सेमिनार मध्ये मार्गदर्शक मान्यवरांचा सूर

“‘योग्य मार्गदर्शन – उज्ज्वल भवितव्य’ : ६०० हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग; गुणवंतांचा गौरव आणि करिअर मार्गदर्शनाचा प्रेरणादायी सेमिनार”

“DYPDPU व IKD मॅथ्स अकॅडमीच्या संयुक्त उपक्रम

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
डॉ. डी. वाय. पाटील ज्ञानप्रसाद विद्यापीठ (DYPDPU), पुणे आणि डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पिंपरी यांच्या संयुक्त विद्यमाने, प्रा. किरण माळी यांच्या IKD मॅथ्स अकॅडमी, अमळनेर यांच्या सहयोगाने, ‘योग्य मार्गदर्शन – उज्ज्वल भवितव्य’ या संकल्पनेवर आधारित करिअर मार्गदर्शन सेमिनार आणि गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. हा प्रेरणादायी कार्यक्रम अमळनेर येथील नर्मदा रिसॉर्ट येथे पार पडला.
या कार्यक्रमास ६०० हून अधिक विद्यार्थ्यांनी व पालकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. कार्यक्रमाची सुरुवात अतिथींच्या औपचारिक स्वागताने झाली. प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. धीरज अग्रवाल (संचालक, सेंट्रल कॉर्पोरेट रिलेशन्स, DYPDPU), डॉ. नितीन शेर्जे (प्राचार्य, DYPIT, पिंपरी), डॉ. पुष्पराज वर्के (डीन, फर्स्ट इयर इंजिनिअरिंग, DYPIT) व आयोजक प्रा. किरण माळी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना मिळाले करिअर मार्गदर्शनाचे मार्गदर्शन

डॉ. धीरज अग्रवाल यांनी अभियंत्रण क्षेत्रातील बदलते ट्रेंड्स, विविध करिअर संधी व उद्योगजगतातील गरजांवर सखोल मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांना भविष्यकालीन तंत्रज्ञानाकडे सजग राहण्याचे आवाहन केले. डॉ. नितीन शेर्जे यांनी अभियांत्रिकी महाविद्यालयांचे विविध प्रकार, त्यांची वैशिष्ट्ये व निवड करताना विचारात घ्यावयाचे मुद्दे समजावून सांगितले. तर डॉ. पुष्पराज वर्के यांनी प्रवेश प्रक्रिया, CAP राऊंड्स, पात्रता निकष, तसेच सरकारी व खासगी संस्थांमधील फरक यावर स्पष्ट व अद्ययावत माहिती दिली.

गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

या कार्यक्रमात दहावी व बारावीमध्ये उल्लेखनीय यश मिळवलेल्या गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. त्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. या सत्कारामुळे उपस्थित विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक प्रेरणा निर्माण झाली.

संवाद व शंका निरसन सत्राने वाढवली कार्यक्रमाची गुणवत्ता

कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांसाठी संवाद व प्रश्नोत्तर सत्र घेण्यात आले. यात तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांच्या शंका सोडवून त्यांना वैयक्तिकरित्या योग्य मार्गदर्शन दिले. पालकांनीही आपले प्रश्न विचारत उत्सुकता व्यक्त केली.

 

 

उत्कृष्ट आयोजनाबद्दल समाधान व्यक्त

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आयोजन प्रा. किरण माळी (संचालक, IKD मॅथ्स अकॅडमी, अमळनेर) यांच्या नेतृत्वात करण्यात आले. त्यांनी मान्यवरांचे आभार मानत सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे व पालकांचे अभिनंदन केले. संयोजन समितीतील प्रा. पंकज परदेशी, प्रा. मुरली इंगळे, प्रा. जितेंद्र नारखेडे, प्रा. योगेश खैरनार व प्रा. शरद अडसुरे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मोलाचे योगदान दिले.

DYPDPU चा ब्रँडिंग प्रभाव

या उपक्रमाच्या माध्यमातून डॉ. डी. वाय. पाटील ज्ञानप्रसाद विद्यापीठाची अमळनेर व संपूर्ण धुळे जिल्ह्यात प्रभावी शैक्षणिक ओळख निर्माण झाली आहे. विद्यार्थ्यांना केवळ मार्गदर्शनच नव्हे, तर त्यांच्या यशाचा गौरव करून आत्मविश्वास वाढवण्याचे कार्य या सेमिनारातून घडले.

विशेष उल्लेख:
विद्यार्थ्यांच्या करिअर घडवण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असून, अशा मार्गदर्शन व प्रेरणादायी कार्यक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही मोठ्या संधींचा मागोवा घेण्याची प्रेरणा मिळते, असे मत पालकांनी व्यक्त केले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *