“तीन पिढ्यांची विठ्ठलभक्ती… राजेंद्र आणि मंगला पाटील यांची मनोभावे वारी!”
1 min read

“तीन पिढ्यांची विठ्ठलभक्ती… राजेंद्र आणि मंगला पाटील यांची मनोभावे वारी!”

Loading

“तीन पिढ्यांची विठ्ठलभक्ती… राजेंद्र आणि मंगला पाटील यांची मनोभावे वारी!”

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
मंगरूळ माध्यमिक विद्यालयाचे उपशिक्षक, हिंदी अध्यापक मंडळाचे खजिनदार तसेच पूज्य साने गुरुजी शिक्षक पतपेढीचे संचालक श्री. राजेंद्र (राजू) पाटील, त्यांच्या पत्नी सौ. मंगला पाटील व चिरंजीव – हे संपूर्ण कुटुंब दरवर्षी पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी होऊन विठोबाच्या दर्शनाचा लाभ घेत असते.
विशेष म्हणजे, ही विठ्ठलभक्ती त्यांच्या घरात तिसऱ्या पिढीपर्यंत चालत आलेली आहे. राजेंद्र पाटील सर यांचे वडील देखील निष्ठेने वारीस जात असत आणि आता त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत राजूसर आणि त्यांच्या पत्नी सौ. मंगला पाटील मागील अठरा वर्षांपासून सलगपणे विठ्ठलसेवा आणि वारीत सहभागी होत आहेत.
हे दांपत्य दरवर्षी नित्यनेमाने पंढरपूर गाठते, विठोबाच्या दर्शनासाठी. कोणतेही काम असो, कितीही जबाबदारी असो – परंतु आषाढी वारीच्या काळात त्यांचे मन आणि तन पूर्णपणे विठ्ठल चरणी अर्पण असते.
दैनिक महाराष्ट्र सारथी चे अमळनेर तालुका प्रतिनिधी व मराठी लाईव्ह चे संपादक ईश्वर महाजन यांच्याशी संवाद साधताना राजू सर म्हणाले, “वारीमध्ये सहभागी होऊन विठोबाचे दर्शन घेतल्यानंतर मनामध्ये एक अनोखी ऊर्जा, समाधान आणि शांती मिळते. विठोबावर आमचा पूर्ण विश्वास आहे. हेच आम्हाला आयुष्यभर प्रेरणा देत राहते.”
राजू सरांचे कुटुंब म्हणजे भक्ती, संस्कार, आणि अध्यात्माचा त्रिवेणी संगमच. पिढ्यानपिढ्या चालत आलेली ही भक्तीभावाची परंपरा आजच्या धावपळीच्या काळात एक आदर्श ठरते.
विठोबा-माऊली त्यांच्या कुटुंबावर सदैव कृपादृष्टी ठेवो, हीच संतांच्या पावन नगरीतील विनम्र प्रार्थना!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *