श्री श्री बीज बँक अंतर्गत बीज प्रदर्शन संपन्न*
![]()
*श्री श्री बीज बँक अंतर्गत बीज प्रदर्शन संपन्न*
दिनांक:- 27/05/2025 रोजी सकाळी 10 वाजता प्रथम वाळूज महानगरात प्रदेशनिष्ठ व पर्यावरण पूरक झाडांच्या बियांचे प्रदर्शन संपन्न झाले. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. बी.जी. गायकवाड साहेब ( शिवसेना उपजिल्हा प्रमुख छ.संभाजीनगर ) डॉ. व्यंकट मैलापुरे साहेब(उद्योजक )व हनुमान भोंडवे साहेब तालुका प्रमुख श्री बाळू शंकर मोरे व विमलताई मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.
वाळूज महानगर वृक्ष मित्र रत्नाकर मोरे व मुरलीधर बेडगे (स्वराज्य देशा संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य) यांनी वृक्ष लागवड व बीज प्रदर्शन शुभारंभ या कार्यक्रमाचे आयोजन केले कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे बी.जी.गायकवाड सर यांच्या हस्ते करण्यात आले.त्यावेळी मान्यवरांनी पर्यावरण पुरक, वृक्षलागवड यावर मार्गदर्शन केले.वाळूज महानगरातील नागरिकांनी व बीकेटी परिवारातील मान्यवरांनी, तसेच छत्रपती संभाजी राजे वृक्ष बँक व वृक्ष संवर्धन वृक्षारोपण फाउंडेशन च्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आपली उपस्थिती दर्शवली
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदरणीय मुरली बेडगे सर व प्रमोद मोगले सर यांनी केले तसेच प्रमुख पाहुण्यांनी हा कार्यक्रम पर्यावरणासाठी/ देशासाठी वेगळी दिशा ठरेल असे सूतोवाच केले.
आयोजन करते रत्नाकर मोरे पर्यावरण प्रेमी व राजेश पाटील यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

