संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या 675 व्या संजीवन समाधी सोहळ्याला मोठ्या संख्येने समाजबांधवांचे आवाहन , “पंढरपूर ते पंजाब: वारकरी संप्रदायाचा पताका उंचावणाऱ्या नामदेव महाराजांच्या स्मरणार्थ भव्य सोहळा”
![]()
संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या 675 व्या संजीवन समाधी सोहळ्याला मोठ्या संख्येने समाजबांधवांचे आवाहन
“पंढरपूर ते पंजाब: वारकरी संप्रदायाचा पताका उंचावणाऱ्या नामदेव महाराजांच्या स्मरणार्थ भव्य सोहळा”
अमळनेर प्रतिनिधी
भागवत धर्माचा पताका पंढरपूर ते घुमान पंजाब पर्यंत नेणारे संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या 675 व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त हजारोच्या संख्येने समाज बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रीय अध्यक्ष महेश जी ढवळे यांनी केले.
वारकरी संप्रदायाचे आद्य प्रचारक व राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक ज्यांनी श्रीक्षेत्र पंढरपूर पासून ते पंजाब येथील श्री घुमान साहेब पर्यंत पायी वारी करून भागवत धर्माचा पताका नेऊन राष्ट्रासाठी महान कार्य केले असे संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा दिनांक 23 आणि 24 जुलै रोजी पंढरपूर येथे भव्य 675 वा संजीवन समाधी सोहळा संत नामदेव महाराज यांचे वंशज नामदास परिवार व अ भा संत नामदेव क्षत्रिय एकसंघाच्या माध्यमातून भव्य दिव्य स्वरूपात साजरा करण्यात येणार असून यासाठी राष्ट्रीय अध्यक्ष व राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष ना. महेश ढवळे साहेब यांनी दि २१,ते २४ जुलै रोजी उत्तर महाराष्ट्रात संपर्क अभियान सुरू केले होते यामध्ये गुजरात व मध्य प्रदेशच्या शेवटच्या गावापर्यंत जाऊन या अभियानाची सुरुवात अमळनेर पासून सकाळी ११ वाजता शिंपी समाज मंदिर (नामदेव पायरी )येथे शिंपी समाज अमळनेर, शिक्षण मंडळ, आदर्श महिला मंडळ ,युवा मंडळ समाज बांधव यांचा कडून बैठकीचे नियोजन करण्यात आले यामध्ये सर्व समाज बांधवांना महेश ढवळे यांनी आव्हान केले की असा सोहळा यानंन्तर पुन्हा 25 वर्षानंतर येणार असून या सोहळ्याचे सर्व समाज बांधवांनी, वारकरी संप्रदायाने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले व समाज एक संघाच्या माध्यमातून संत नामदेव महाराजांनी केलेल्या कार्याची ख्याती पाहायला व ऐकायला मिळणार आहे. याच दिवशी मा मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या शुभहस्ते संत नामदेव महाराजांच्या स्मारकाचे उद्घाटन सुद्धा होणार असल्याचे त्यांनी याप्रसंगी सांगितले तसेच याच दिवशी हेलिकॉप्टर द्वारे संत नामदेव महाराजांच्या समाधी स्थळावर पुष्पवृष्टी करण्यात येणार असल्याचे सुद्धा त्यांनी याप्रसंगी सांगितले गेल्या चार दिवसापासून संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातील 25 ठिकाणी त्यांनी प्रत्यक्ष बैठकी भेटी घेऊन या कार्यक्रमाचे आमंत्रण दिले त्यांच्या समवेत सचिव रुपेश खांडके ,कोषाध्यक्ष अनिल गचके राष्ट्रीय संघटक मनोज भांडारकर ,प्रदेशाध्यक्ष गणेश उंडाळे ,विश्वस्त नितीन बाविस्कर, रुपेश बागुल ,तसेच अँड संजय शिंपी ,सुषमाताई सावळे प्रदेश युवा अध्यक्ष प्रमोद शिंपी ,गजेंद्र शिंपी, गणेश सोनवणे , जिल्हाध्यक्ष बंडू नाना शिंपी शरद सोनवणे , प्रमोद शिंपी अमित जगताप, अशोक सोनवणे यांनी या दौऱ्यामध्ये सहभाग घेतला मा महेश ढवळे साहेब यांची महाराष्ट्र राज्य अन्न आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल समाज बांधव पदाधिकारी कार्यकर्ते महिला मंडळ त्यांचा वतीने भव्य सत्कार करण्यात आला या प्रसंगी सर्वांनी त्यांना हजारोच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आश्वासन दिले

