जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र तर्फे गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप कार्यक्रम संपन्न …
![]()
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र तर्फे गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप कार्यक्रम संपन्न …
आज दि. २६/०६/२०२५ रोजी छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त सामाजिक समरसता दिनाचे औचित्य साधून कै. बळीरामदादा माध्यमिक विद्यालय ब्राम्हणवेल येथे जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र तर्फे विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप कार्यक्रम संपन्न झाला. शालेय आदिवासी मागासवर्गीय गरीब होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक अडीअडचणीला हातभार लावला जावा व विद्यार्थ्यांनी नियमित शाळेत उपस्थित रहावे या उद्देशाने प्रोत्साहन देणारे आमच्या विद्यालयाचे दिवंगत शिक्षक कै. सुरेश लक्ष्मण सोनवणे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांचे जेष्ठ सुपुत्र साक्री तालुका युवा शिवसेना अध्यक्ष चि. हर्षल सुरेश सोनवणे यांनी समाजातील दानशूर व्यक्ती मा. निलेश सांबरे अध्यक्ष, जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र यांच्याशी समन्वय साधून संस्थेमार्फत शालेय गरजू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून घेतले. व विद्यालयातील शालेय २०० विद्यार्थ्यांना आज स्वतः उपस्थित राहून वह्या वाटप केल्या. याप्रसंगी संस्थेचे सचिव मा. एकनाथ बळीराम महाजन, मुख्याध्यापक मा. माळी बी. एन. , विज्ञान शिक्षक श्री. माळी के. एन., कलाध्यापक श्री. सोनवणे एच. टी., क्रीडा शिक्षक श्री. निकुंभ बी. एस., यांनी प्रसंगानुरूप मनोगते मांडली गणित शिक्षक श्री. रविंद्र सुर्यवंशी, लिपिक, श्री. चेतन महाजन, शिपाई श्री. पंडित खैरनार, श्री. सुनिल ठाकरे व बहुसंख्य विद्यार्थी-विद्यार्थ्यीनी उपस्थित होते. विद्यार्थांना व संस्थेला मदत मिळावी म्हणून विविध संस्थांशी संपर्क करणारे व विद्यार्थ्यांपर्यंत मदत पोहचणे कामी सतत पाठपुरावा करून कार्यक्रमात उल्लेखनीय बाबींचा समावेश करून प्रस्तावना मांडणारे होतकरू शिक्षक श्री. माळी के. एन. यांनी मोलाचे कार्य केले. सुत्रसंचलन श्री. निकुंभ बी. एस. तर आभार प्रदर्शन श्री. सोनवणे एच. टी. यांनी केले .

