सत्यशोधक विचाराचा राजा शाहू महाराज !!!
1 min read

सत्यशोधक विचाराचा राजा शाहू महाराज !!!

Loading

सत्यशोधक विचाराचा राजा शाहू महाराज !!!

महाराष्ट्रामध्ये महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाचा पाया घातला. पुण्यातील मनुवादी विचाराचे खंडन करून सत्याला मानणारा व त्यास कृतीने जगणारा समाज निर्माण केला. सत्याला मानणारी परंपरा हे भारताचे वैशिष्ट्य आहे. या परंपरेला बुद्धानंतर खंड पडला होता. अनेक महापुरुषांनी महावीर, बसवेश्वर, संत नामदेव, संत तुकाराम, गोरा कुंभार, सावता माळी अशा अनेक संतांचे योगदान विवेकी विचार आला मिळाले. महात्मा फुले यांच्या सत्यशोधक चळवळीच्या माणसांनी छत्रपती शाहू महाराजां पर्यंत सत्यशोधक विचार पोहोचवला. छत्रपती शाहू महाराज यांनी आयुष्यभर सत्यशोधक विचाराची पाठ राखण केली. शाहू महाराज हे शिवाजी चौथे यांचे दत्तक पुत्र होय. इंग्रजांच्या काळात शिवाजी चौथे व आनंदीबाई यांना मूलबाळ नव्हते. शाहू महाराजांचा जन्म २६ जून १८७४ ला कोल्हापूर येथे झाला. त्यांचे घराणे मोर्चे कागलचे होते. छत्रपती शाहूंच्या वडिलांचे नाव जयशिंगराव घाटगे होते. आईचे नाव राधाबाई होते. राधाबाई राज घराण्यातील महिला होती. जयसिंगराव आबासाहेब या नावाने परिचित होते.आई राधाबाई शाहू महाराज तीन वर्षाच्या असताना वारली. आबासाहेब उर्फ जयसिंगराव यांनी यशवंत ला आईची उणीव भासू दिली नाही. कोल्हापूर संस्थानात काम करीत असताना यशवंतची काळजी घेतली. शाहू महाराज बारा वर्षाचे असताना दत्तक म्हणून शिवाजी चौथे यांच्या पत्नीने म्हणजे आनंदीबाई ने यशवंतला दत्तक घेतले. जय शिवराय घाटगे पाटील जिवंत असताना त्यांनी पुत्र यशवंतला राजकोट येथे प्राथमिक शिक्षणासाठी दाखल केले. त्यानंतर स्टुअर्ट फ्रेझर यांची नियुक्ती यशवंतला शिकवण्यासाठी केली. स्टुअर्ट फ्रेझर इंग्रज अधिकारी शाहू महाराजांचे पहिलें गुरु होते. या अधिकाऱ्याने शाहू महाराजांच्या जडणघडणीत फार मोठे योगदान आहे. स्टुअर्ट फ्रेझर यांनी शाहू महाराजांना भाषा, गणित, विज्ञान, समाजशास्त्र, मानसशास्त्र, नेतृत्व याबाबत सर्व तरबेज केले. शाहू महाराज कुशाग्र बुद्धीचे होते. शरीर संवर्धनासाठी लहानपणापासूनच त्यांना आवड होती. वडील जय शिवराय यांनी छत्रपती शाहूंना सर्व प्रकारचे युद्धाचे ज्ञान शिकवण्यासाठी तज्ञ गुरु ठेवले होते. छत्रपती शाहूंना स्वतःच शस्त्र चालवण्याची आवड होती. शिकार करणे हा त्यांच्या आवडता छंद होता. त्यांनी कधी निष्पाप प्राण्यांची शिकार केली नाही. शेतकऱ्यांना त्रास देणारे प्राणी हे त्यांचे शिकारीचे सावज होते. शाहू महाराजांचे दुसरे गुरु रघुनाथ सबनीस होते. राज्यकारभाराच्या हिशोब व व्यवहाराबाबत त्यांनी शाहू महाराजांना ज्ञान दिले. शाहू महाराज प्रज्ञावंत राजा होते. आपल्या अचूक निरीक्षण शक्तीने राज्यकारभार कोणत्या गोष्टी बोजड आहेत याचा त्यांनी चांगला अभ्यास केला होता. प्रत्येक समाजात जाऊन त्यांनी त्या समाजाच्या समस्या कोणत्या आहेत याबाबत माहिती घेतलेली होती. मनुवाद्यांनी बहुजनांना ज्ञान घेण्यासाठी बंद केलेले दरवाजे त्यांनी खुले केले. आपण राजा असताना आपल्यासारख्या व्यक्तीला मनुवादी शूद्र समजून पूजा करण्याच्या वेळेला वेदातील मंत्राचा वापर करीत नाही. आपल्याला सुद्धा शूद्र समजतो. बहुजनांना तर हे कोणते ज्ञान समजू देत नसतील हे त्यांच्या लक्षात आले. आपल्या राज्यातील बहुजनांचा विकास का होत नाही याचे कारण त्यांनी शोधून काढले. सर्व समाजातील मुलांना शिकण्यासाठी शाळा सुरू केल्या. शाळा सुरू झाल्यावर त्यांना राहण्यासाठी अडचणी येत होत्या. त्यामुळे सर्व समाजाच्या मुलांसाठी वस्तीगृह तयार केले.बहुजन समाजातील मुले शिकू लागली. खऱ्या अर्थाने भारतामध्ये वस्तीगृह निर्माण करणारा पहिला राजा आहे. विद्यार्थी शिकून मोठे झाल्यावर बहुजन समाजातील मुलांना नोकऱ्या उपलब्ध नव्हत्या. बऱ्याच प्रकारच्या नोकऱ्या मनुवादी, सावकार, भांडवलवादी लोकांनी बळकावल्या होत्या. छत्रपती शाहूंनी आपल्या राज्यात नोकरीमध्ये सर्व समाजाच्या लोकांसाठी ५०% आरक्षणाची तरतूद केली. राज्यकारभारात बहुजनांचे मुलं कामाला लागली. मानवतावादी या राजाने मानवतावादी विचार केला. आज आरक्षण चालू आहे. हे आरक्षण बाबासाहेब आंबेडकरांनी छत्रपती शाहू यांनी करून दाखवलेल्या कृतीतूनच घेतलेले आहे. आज बहुजनांची मुले शिकून व्यवस्थेत नोकरीला लागलेली आहे. हे महान काम आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू यांनी केलेले आहे. छत्रपती शाहूंनी समाजाच्या मानसशास्त्राचा चांगला अभ्यास केलेला होता. राज्यकारभारात बहुजनांना नोकरी दिल्यामुळे मनुवादी बहुजनांच्या मुलांना त्रास देत होती. जातिभेद करीत होती. छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या राज दरबारात अनेक लोक विविध जातीतील घेतलेले होते. गंगाराम कांबळे हा एक दलित समाजातील व्यक्ती होता. राजा दरबारातील लोक जातिभेद करून गंगाराम कांबळे यांना वेगवेगळ्या आळ लावून मारहाण करीत असत. अति झाल्यावर गंगाराम कांबळे यांनी शाहू महाराजांना सर्व अन्याय कशा पद्धतीने चालतो हे सांगितले. एकदा गंगाराम कांबळे यांनी सर्वांसाठी ठेवलेल्या माढा मधील पाणी घेतले. त्यावेळी त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. अस्पृश्य व्यक्तीने पाणी बाटविले म्हणून त्यांच्यावर अन्याय केलेला होता. महाराजांसमोर गंगाराम कांबळे यांची फिर्याद आल्यावर शाहू महाराजांनी जातिभेद करणाऱ्या सवर्ण व्यक्तीला चाबुकाचे फटके मारून शिक्षा केली. असा न्यायी राजा आपल्याला लाभला आहे हा बहुजनांना आनंदाचा क्षण होता. बहुजनातील सर्व समाज जातीपातीच्या राजकारणापासून दूर जाण्यासाठी शाळा सुरू केल्या. समाजातील पीडित जातीच्या लोकांच्या घरी छत्रपती शाहू जेवायला जात असत. राज्यात मानवता उभी करणारा हा मौलिक राजा होता. बहुजनातील मुलांनी शिकावे म्हणून शाळेत पाल्याला न पाठवणाऱ्या पालकाला एक रुपया दंड करणारा हा दूरदृष्टी असलेल्या राजा होता. शाहू महाराजांनी आपल्या राज्यकारभारात पूजा ,पाठ यावर होणारा अमाप खर्च बंद केला. मंदिरे उभे करण्याऐवजी माणसा माणसात माणुसकीची चैतन्य फुलविले. शाहू महाराजांना सत्यशोधक विचार आवडू लागले. त्यामुळे त्यांनी सत्यशोधक वक्त्यांची कोल्हापूरमध्ये भाषणे आयोजित केले. सर्वच प्रकारच्या समाजाला दान देण्याचे काम या महामानवाने केले. आपल्या राज्यातील महसुलातून येणारा पैसा समाजाच्या हितासाठी वापरणारा हा राजा होता. प्रत्येक समाजाला या राजाने न्याय दिला नाही तर सामाजिक न्याय प्रत्यक्ष रुजवून दाखविला. मी राजा आहे हा व्यर्थ अभिमान त्यांनी कधी अंगी बाणला नाही. समाजाच्या उन्नतीसाठी अहोरात्र झिजणारा हा राजा होता. असंख्य राजे झालेत परंतु समाजात राहणारा राजा होणार नाही.

पत्रकार
एस.एच.भवरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *