अमळगाव येथील समाधान शिबिरात बालविवाह मुक्त भारत अभियान
![]()
अमळगाव येथील समाधान शिबिरात बालविवाह मुक्त भारत अभियान
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान अमळनेर
टाकरखेडा येथे दिनांक 26जून 2025 रोजी सर्व शासकीय योजना माहिती
All Government Schemes
प्रदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले.
शिबिराचे उद्घाटन नितीन मुंडावर सर यांच्या हस्ते करण्यात आले.
आधार संस्था,जस्ट राईट फॉर चिल्ड्रन प्रकल्पाचा प्रदर्शन स्टॉल द्वारे नागरिकांना बालविवाह मुक्त भारत अभियान विषयी माहिती देण्यात आली. नागरिकांना बालविवाह मुक्त भारत करण्याचे आवाहन केले .
प्रांत अधिकारी नितीनकुमार मुंडावरे, तहसीलदार रूपेशकुमार सुराणा, कृषी विभाग अधिकारी, पंचायत समिती,आरोग्य विभाग,पोलिस , विधी सहाय्यक प्रशासन,महिला बचत गट , शासकीय कर्मचारी, अमळगाव, निंभोरा जळोद,कलाली, दोधवद, हिंगोणा, पिंपरी, सात्री पिंगळवाडे, मेहेरगाव,मुडी सरपंच, उपस्थित राहून योजने विषयी मार्गदर्शन करत आहेत.
आधार बहुउद्देशीय संस्था अमळनेर जिल्हा जळगाव ,
जस्ट राईट फॉर चिल्ड्रेन टीम मेंबर अध्यक्ष डॉ भारती पाटील, संचालक रेणू प्रसाद , प्रकल्प समन्वयक आनंद पगारे, मोहिनी धनगर, समाधान अहिरे, भावेश मराठे, राहुल पवार यांनी सहभाग घेतला.

