राजकारण- समाजकारणातील गौरवशाली कर्तृत्वाबध्दल* *आमदार सुनिल प्रभू यांना “लोकस्वातंत्र्य समाजरत्न गौरव राज्यस्तरीय पुरस्कार..!”*  *लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेकडून सेनाभवनात त्यांचा सन्मान..!*
1 min read

राजकारण- समाजकारणातील गौरवशाली कर्तृत्वाबध्दल* *आमदार सुनिल प्रभू यांना “लोकस्वातंत्र्य समाजरत्न गौरव राज्यस्तरीय पुरस्कार..!”* *लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेकडून सेनाभवनात त्यांचा सन्मान..!*

Loading

*राजकारण- समाजकारणातील गौरवशाली कर्तृत्वाबध्दल* *आमदार सुनिल प्रभू यांना “लोकस्वातंत्र्य समाजरत्न गौरव राज्यस्तरीय पुरस्कार..!”*

*लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेकडून सेनाभवनात त्यांचा सन्मान..!*

*मुंबई* – सामाजिक संवेदनशिलता आणि मानवतावादी सामाजिक भावनांनी जनहृदयात स्थान मिळवित जनसेवेतून राजकीय आणि सामाजिक यशाला पात्र ठरलेले दिंडोशी मतदार संघाचे शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे आमदार व मुंबईचे माजी महापौर आमदार सुनिल प्रभू यांना लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेकडून ” लोकस्वातंत्र्य समाजरत्न गौरव” या प्रतिष्ठीत राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.मार्च महिन्यात मुंबईतील आयोजित एका कार्यक्रमामध्ये आमदार प्रभू अधिवेशनामुळे उपस्थित राहू शकले नव्हते.त्यामुळे आज दादरच्या शिवसेना भवनात
लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे संस्थापक- राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम.देशमुख व राष्ट्रीय पदाधिकारी तथा शासनाच्या साहित्य व संस्कृती मंडळाचे माजी सदस्य,कादंबरीकार पुष्पराज गावंडे ,यांचे हस्ते त्यांना सन्मान स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र, शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.या सत्कारामध्ये लोकस्वातंत्र्यचे मंत्रालयीन समन्वयक,तथा महाराष्ट्र संघटन प्रमुख रफिक मुलानी,विनोद चाळके,सुहास मोरे,अॕड.साने हे सुध्दा सहभागी होते.रफिक मुलानी यांनी ही भेट यावेळी घडवून आणली होती.

जनमाणसाच्या वास्तव समस्यांचा अभ्यास करून त्या विधानसभेच्या पटलावर ठेवत त्यासाठी आक्रमक भूमिका घेणारे एक संवेदनशील अभ्यासू लोकप्रतिनिधी म्हणून आमदार सुनिलभाऊ प्रभू यांचा सिध्द परिचय लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघापर्यंत पोहचला होता.त्यांच्या या सामाजिक साधनेचे यथोचित मुल्यमापन संघटनेकडून करण्यात आले.त्या उल्लेखनिय वाटचालीचा गौरव आणि त्यांच्या जनसेवेच्या प्रखर संवेदनशील वाटचालीत त्यांना सकारात्मक सदिच्छाशक्तीचं नैतिक पाठबळ म्हणून त्यांचा हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे.

आमदार प्रभू यांनी मुंबई महानगरपालिकेचे महापौरपद भूषवून सामाजिक विकास करीत नागरी समस्यांना सोडविण्याचे व्यापक कार्य केलेले आहे. दिंडोशी मतदारसंघात त्यांनी एक अभ्यासू आणि कर्तव्यदक्ष तथा जनभावनांची दखल घेणारा समाजाभिमुख जनसेवक म्हणून आपला परिचय सिध्द केलेला आहे.शिवसेना नेते आणि महापौर म्हणून. मुंबई महानगरीचा विकास साधत मध्यमवर्गीयांच्या ज्वलंत समस्यांना प्राधान्य देऊन त्या सोडविण्यात महत्वपूर्ण भुमिका बजावली आहे.जनता अदालतींच्या आयोजनातून वृध्द,गरोदर माता, वंचित, निराश्रितांच्या समस्यांना सोडविण्याचे प्रयत्न करणारे मध्यमवर्गियांचे सेवक म्हणून जनतेने शिक्कामोर्तब केलेले आमदार अशा प्रतिक्रिया जनमाणसातून त्यांच्याबद्दल व्यक्त झालेल्या आहेत.

तीन वेळा आमदार आणि त्यापूर्वी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे महापौरपद भुषवून यशस्वी राजकीय वाटवालीतून जनहृदयात स्थान मिळवणारे एक संवेदनशील लोकप्रतिनिधी म्हणून मिळविलेला नावलौकिक हा त्यांना समाजाकडून मिळालेला एक बहूमोल सन्मान ठरलेला आहे.या संबंध सामाजिक राजकीय वाटचालीच्या वास्तव आलेखामुळेच लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाकडून गेल्या मार्च महिन्यातच त्यांची निवड करण्यात आली होती. तो समाजरत्न गौरव पुरस्कार त्यांना काल शिवसेनाभवनात प्रदान करण्यात आला आहे.

ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्य मध्यमवर्गियांच्या प्रश्नांकडेही लक्ष केंद्रीत करून त्या सोडवून सर्वसामान्यांचे कल्याण साधणारे एक उदात्त विचारांचे संवेदनशील सेवाभावी आमदार म्हणून त्यांनी मतदारसंघातून सक्रियतेचा नावलौकिक सिध्द केला आहे. जनतेच्या प्रश्नांचे अविलंब निरसन होऊन त्यांचे हक्क अबाधित ठेवण्यासाठी जनता दरबाराचे आयोजने हा त्यांचा उपक्रम प्रभावी ठरलेला आहे.

ज्यांच्यावर विश्वासाने योग्यतेचे शिक्कामोर्तब केले जाते, त्या जनसेवकाने आपल्या भावनांचा आदर करून आपणास कशाप्रकारे न्याय दिला ह्या खूनगाठी जनता अंतरंगात कायम जतन करीत असते. त्या परीक्षेत उत्तिर्ण होऊन खऱ्या जनभावनांचा मौलिक ठेवा प्राप्त करणारे महाराष्ट्रातील एक यशस्वी आमदार म्हणून लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेकडून त्यांचे अभिनंदन करीत त्यांना शुभेच्छांसह त्यांना लोकस्वातंत्र्य समारत्न गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *