लायन्स क्लब, अमळनेरची नूतन कार्यकारिणी जाहीर:- डॉ. संदीप जोशी अध्यक्षपदी, महेंद्र पाटील सचिव, नितीन विंचूरकर खजिनदार पदी निवड
1 min read

लायन्स क्लब, अमळनेरची नूतन कार्यकारिणी जाहीर:- डॉ. संदीप जोशी अध्यक्षपदी, महेंद्र पाटील सचिव, नितीन विंचूरकर खजिनदार पदी निवड

Loading

लायन्स क्लब, अमळनेरची नूतन कार्यकारिणी जाहीर:-
डॉ. संदीप जोशी अध्यक्षपदी, महेंद्र पाटील सचिव, नितीन विंचूरकर खजिनदार पदी निवड

अमळनेर प्रतिनिधी
सामाजिक आणि सेवाभावी क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या लायन्स क्लब, अमळनेरची २०२५-२६ या वर्षासाठीची नवीन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. क्लबच्या सदस्यांनी एकमताने नवीन पदाधिकाऱ्यांची निवड केली आहे.
यावेळी नूतन अध्यक्षपदी डॉ. संदीप जोशी यांची निवड झाली असून, सचिवपदाची धुरा महेंद्र पाटील यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. तर नितीन विंचूरकर हे खजिनदार म्हणून काम पाहणार आहेत.
नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ येत्या रविवारी, दिनांक ६ जुलै रोजी सायंकाळी ६.३० वाजता हॉटेल मिड टाऊन येथे आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याला ज्येष्ठ कलाकार, लेखक, निर्माता, दिग्दर्शक अशोकजी समेळ आणि पीजीडी गिरीशजी शिसोदिया यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. लायन्स क्लब, अमळनेरच्या पुढील वर्षाच्या समाजोपयोगी कार्यांना या नवीन कार्यकारिणीमुळे नवी दिशा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *