समाज कल्याण न्यास महाराष्ट्र राज्याच्या वतीने कुरुंद येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न!, समाज कल्याण न्यास या संस्थेच्या शैक्षणिक भवनासाठी माझ्याकडून एक एकर जागा दान- राजाराम पाटील
1 min read

समाज कल्याण न्यास महाराष्ट्र राज्याच्या वतीने कुरुंद येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न!, समाज कल्याण न्यास या संस्थेच्या शैक्षणिक भवनासाठी माझ्याकडून एक एकर जागा दान- राजाराम पाटील

Loading

समाज कल्याण न्यास महाराष्ट्र राज्याच्या वतीने कुरुंद येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न!,
समाज कल्याण न्यास या संस्थेच्या शैक्षणिक भवनासाठी माझ्याकडून एक एकर जागा दान- राजाराम पाटील

ठाणे:भिवंडी (मनिलाल शिंपी)समाज कल्याण न्यास महाराष्ट्र राज्य या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, धर्म सेवक डॉ.श्री. सोन्या काशिनाथ पाटील यांच्या माध्यमातून गेल्या 22 वर्षापासून अखंडितपणे ठाणे, पालघर ,बीड, परभणी,जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात समाज कल्याण न्यास च्या माध्यमातून अनेक उपक्रम साजरी केले जातात. याचाच एक भाग म्हणून जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून रविवार दिनांक 22/6/2025 रोजी आर.एच. पाटील फार्म ,बी.बी. पाटील जुन्या शाळेजवळ कुरुंदगाव पडघा भिवंडी येथे वृक्षारोपण
कार्यक्रम मोठ्या उत्साह पूर्ण वातावरणात करण्यात आला.यावेळी
संस्थापक अध्यक्ष धर्म सेवक डॉ.श्री.सोन्या काशिनाथ पाटील,
भुमी दान करणारे ठाणे जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण अधिकारी श्री.राजाराम .एच. पाटील, श्री.नारायण मामा पाटील कार्याध्यक्ष समाज कल्याण न्यास महाराष्ट्र राज्य , दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक तथा समाज कल्याण न्यास प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ.श्री.किशोर बळीराम पाटील श्री.सुधीर जावळे – उत्तर महाराष्ट्र शिक्षक सेना अध्यक्ष,
श्री.जयवंत काशिनाथ पाटील उपाध्यक्ष समाज कल्याण न्यास,
श्री.प्रितेश सोन्या पाटील युवा अध्यक्ष समाज कल्याण महाराष्ट्र राज्य ,सौ. नलिनी चौधरी – ठाणे जिल्हा महिला अध्यक्षा, श्री. चिंतामण वेखंडे माजी विस्तार अधिकारी ठाणे जिल्हा, श्री. धनंजय जाधव अध्यक्ष उत्कर्ष मानव सेवा संस्था.श्री. रघुनाथ पाटील माजी सरपंच ग्रामपंचायत कुकसे. श्री.मनोहर पाटील माजी सरपंच ग्रामपंचायत कुकसे उपस्थित होते.आज जगातून माणुसकी हरवत चाललेली आहे प्रत्येकाने माणुसकी जपली पाहिजे माणुसकी जपण्यातच खरं सुख आहे इतरांच्या आनंदातच आपला आनंद शोधणे तळागाळातील लोकांना मदत करणे त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवणे, आनंदाचे क्षण सर्वांन सोबत साजरी करणे, आपण आनंदी तर आहोतच पण आपल्यामुळे इतरही कसे आनंदी राहतील यासाठी समाज कल्याण
न्यास चे संस्थापक अध्यक्ष डॉ.श्री. सोन्या काशिनाथ पाटील
सतत प्रयत्नशील असतात. म्हणून सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी मी देखील त्यांच्यासोबत काम करेन तसेच त्यांच्या या स्तुत्य उपक्रमासाठी
मी माझ्या स्वतःच्या मालकीची एक एकर भूमी त्यांच्या शैक्षणिक भवनासाठी दान करत आहे असे ठाणे जिल्हा परिषदेचे माजी शिक्षणाधिकारी श्री. राजाराम पाटील यांनी यावेळी प्रत्यक्ष दैनिक स्वराज्य तोरणशी बोलताना सांगितले. म्हणूनच सदर जागेत आज वृक्षारोपण करून चांगल्या कार्याला सुरुवात केली आहे असेही त्यांनी शेवटी सांगितले. त्याचप्रमाणे धनंजय जाधव व चिंतामण वेखंडे यांनी देखील समाज कल्याण न्यास या संस्थे विषयी व संस्थापक अध्यक्ष सोन्या पाटील यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले.या वृक्षारोपण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री.सुधीर जावळे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *