सर्वोदय अवॉर्ड स्कॉलरशिप परीक्षेमध्ये आराध्या महाजन राष्ट्रीय स्तरावर पाचवी रँक राखून मेरिट मध्ये उत्तीर्ण
![]()
सर्वोदय अवॉर्ड स्कॉलरशिप परीक्षेमध्ये आराध्या महाजन राष्ट्रीय स्तरावर पाचवी रँक राखून मेरिट मध्ये उत्तीर्ण
(कृष्णा अरुण महाजन,एरंडोल तालुका प्रतिनिधि)= सर्वोदय अवॉर्ड स्कॉलरशिप, कालिकत केरळ द्वारे आयोजित सर्वोदय अवॉर्ड स्कॉलरशिप स्कीम अंतर्गत 2024/25 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये एरंडोल येथील न्यू इंग्लिश मेडियम स्कूलची विद्यार्थिनी कु.
*आराध्या कृष्णा महाजन* राष्ट्रीय स्तरावर पाचवी रँक राखून
मेरिटमध्ये उत्तीर्ण झाली आहे. त्याबद्दल तिला मेरीट मध्ये आल्याबद्दल प्रमाणपत्र व गोल्ड मेडल, रोख रक्कम असे मिळाले.तिच्या या घवघवीत यशाबद्दल शाळेचे प्रिन्सिपल हॅरी जॉन , व्हाइस प्रिन्सिपल सरला मॅडम, वर्गशिक्षक अश्विनी मॅडम , तिचे आई,वडील,आजी,आजोबा, काका, मामी, मामा यांनी तिचे अभिनंदन केले. आराध्या ही विखरण
येथील रहिवासी कृष्णा अरुण महाजन व सौ.देवयानी महाजन यांची मुलगी आहे.

